Jitendra Awhad : एकाच घरातील पाच नावे वेगवेगळ्या केंद्रावर, जिवंत माणसे मृत दाखवण्याचा प्रयत्न; मतदार यादीवरून जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला. त्यांनी सांगितले की, मतदार यादी सुद्धा चुकीच्या पद्धतीने छापली गेली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मतदारयादी मध्ये हेरगिरी करून नावे परस्परपणे कमी केली जात असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीकरून करण्यात आला आहे. आज (18 ऑक्टोबर) महाविकास आघाडीकडून शिवालयामध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सतेज पाटील यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी महाविकास महायुतीकडून महायुती सरकारवर गंभीर आरोप करण्यात आले. संयुक्त पत्रकार परिषद घेतल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीसाठी पोहोचले.
प्रत्येक मतदारसंघातून 5 हजार नावे कमी करण्याचा डाव
जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना सुद्धा गंभीर आरोप केला. जितेंद्र आव्हाडे म्हणाले की प्रत्येक मतदारसंघातून 5 हजार नावे कमी करण्याचा डाव महायुती सरकारकडून करण्यात येत आहे. ते पुढे म्हणाले की फॉर्म नंबर सात हा ऑनलाईन भरण्याची पद्धत चुकीची आहे. प्रत्येक मतदारसंघातून 5 हजार नावे कमी करण्याचा डाव आहे. सिन्नरमध्ये अशीच पाच हजार नावे वगळण्यात आली. मात्र, आक्षेप घेतल्यानंतर परत आली. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला. त्यांनी सांगितले की, मतदार यादी सुद्धा चुकीच्या पद्धतीने छापली गेली आहे. त्यामुळे निवडणूक पद्धत संशयास्पद ते म्हणाले. या सर्व प्रक्रियेमुळेच मतदानाची टक्केवारी घसरत असल्याचा आरोप त्यांनी केला. एकाच घरातील पाच नावे वेगळ्या केंद्रावर असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान महायुती सरकारने घेतलेल्या शासन निर्णयावर सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी कडाडून हल्लाबोल केला. ते म्हणाले की आचारसंहिता लागू झाल्यानंतर 122 शासन निर्णय काढण्यात आले. अनेक टेंडर सुद्धा काढण्यात आली, नियुक्त्या सुद्धा करण्यात आला. या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिले असून हे सर्व रद्द झालं पाहिजे अशी मागणी आव्हाड यांनी केली.
एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात
दरम्यान, मतदार यादीमधून नावे गहाळ करण्यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. प्रत्येक मतदारसंघातून दहा ते वीस हजार नावे कमी करण्याचा डाव असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी महिला सरपंचाचा व्हिडिओ दाखवत कशा पद्धतीने मतदारयादीमधून नावे गहाळ केली जात असल्याचे सांगितले. योजनादुतांची नियुक्ती करण्यात आली आहे ती रद्द करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली. फॉर्म नंबर सातचा वापर करून मतदार यादीमधून नावे कमी केले जात असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला.
इतर महत्वाच्या बातम्या