एक्स्प्लोर

Maharashtra Unlock : आजपासून पुनःश्च हरिओम! राज्यातील 14 जिल्हे पूर्णपणे निर्बंधमुक्त; ठाणे-नवी मुंबईतही निर्बंध शिथिल

Maharashtra Unlock : राज्यातील 14 जिल्हे आजपासून पूर्णपणे निर्बंधमुक्त, नाट्यगृहं-थिएटर्स-रेस्टॉरन्ट पूर्ण क्षमतेनं सुरु होणार आहेत. ठाणे-नवी मुंबई पालिका क्षेत्रातही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

Maharashtra Unlock : राज्यातील 14 जिल्हे आजपासून पूर्णपणे अनलॉक (Maharashtra Corona Guidelines) होणार आहेत. त्या 14 जिल्ह्यात नाट्यगृहं, सिनेमागृहं, रेस्टॉरंट्स 100 टक्के क्षमतेनं सुरु होणार आहेत. तर इतर जिल्ह्यात 50 टक्के क्षमतेची अट कायम असणार आहे. यासोबतच 14 जिल्ह्यांतली पर्यटन स्थळं, धार्मिक स्थळंही 100 टक्के क्षमतेनं सुरु होणार आहेत. 

गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत (Coronavirus) होत असलेली घट लक्षात घेऊन राज्य सरकारनं 14 जिल्ह्यांमधील कोरोना (Covid-19) निर्बंध शिथील (Maharashtra Unlock) करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगरसह राज्यातील 14 जिल्हे पूर्णपणे अनलॉक करण्यात आले आहेत. 

प्रशासनानं जे 14 जिल्हे अनलॉक केले आहेत, त्यामध्ये ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा समावेश नाही. त्यामुळं ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, भिवंडी, मीरा भाईंदर, वसई विरार इत्यादी महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रांना राज्य सरकारच्या नव्या निर्णयाचा लाभ होणार नाही. पण, ठाणे जिल्ह्यातील ठाणे आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. ठाणे, नाशिकसह उर्वरित 22 जिल्ह्यांमध्ये 50 टक्के क्षमतेचे निर्बंध कायम असतील. रेल्वे किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवासाकरिता लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवासाची मुभा कायम ठेवण्यात आली आहे.

14 जिल्हे अनलॉक करण्याचे निकष 

  • पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 90  टक्क्यांपेक्षा अधिक
  • दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 70 टक्क्यांपेक्षा  अधिक 
  • पॉझिटिव्हीटी रेट हा 10 टक्क्यापेक्षा कमी हवा 

मुंबई शहर आणि मुंबई उपनगरांसह 14 जिल्ह्यांमध्ये आज मध्यरात्रीपासून म्हणजेच, 4 मार्च रोजी मध्यरात्री बारा वाजल्यापासून राज्य सरकारचा नवा निर्णय लागू झाला आहे. या निर्णयानुसार, 14 जिल्ह्यांत नाट्यगृहं, सिनेमागृहं, रेस्टॉरंट्स-बार, व्यापारी संकुलं, क्रीडा संकुलं, जलतरण तलाव, धार्मिक स्थळं, पर्यटनस्थळं आणि मनोरंजन पार्कस 100 टक्के क्षमतेनं सुरु होणार आहेत. इतर जिल्ह्यांमध्ये 50 टक्के क्षमतेची अट कायम ठेवण्यात आली आहे.

मागील काही आठवडे कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट होत आहे. देशातील विविध राज्यांमध्ये रुग्णसंख्या बऱ्यापैकी नियंत्रणांत आल्यानं आता केंद्र सरकारनं नव्या अनलॉक गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानं इतर व्यवहारही सुरळीत व्हावे यासाठी या नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. राज्यातल्या 14 जिल्ह्यात 4 मार्चपासून नाट्यगृहे, सिनेमागृहे , रेस्टॉरंट्स, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळेही 100 टक्के क्षमतेनं सुरु होणार आहे.  इतर जिल्ह्यात 50 टक्के क्षमतेची अट कायम होणार आहे. 

राज्यातील कोणते जिल्हे निर्बंधमुक्त?

मुंबई शहर
मुंबई उपनगर
पुणे
नागपूर
भंडारा
सिंधुदुर्ग
रायगड
वर्धा
रत्नागिरी
सातारा
सांगली
गोंदिया
चंद्रपूर
कोल्हापूर

नवे नियम काय?

  • राज्यातील सर्व सरकारी, खासगी कार्यालये  100 टक्के उपस्थितीसह सुरू करण्यास परवानगी
  • शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी 
  • रेल्वे किंवा बसने प्रवास करताना लसीचे दोन डोस बंधनकारक 
  • चित्रपटगृहे , मॉल्स आणि इतर ठिकाणी प्रवेश देताना  लसीचे दोन डोस बंधनकारक
  • मनोरंजन आणि उद्यानं, जलतरण तलाव, वॉटर पार्क यांनाही पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी
  • लग्नसमारंभ तसंच अत्यंसंस्कार विधी इत्यादींवरील निर्बंधही हटवले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Car Accident Rap Song : पैसे मेरे बाप के...दोघांना चिरडल्यानंतर आरोपीचं रॅप साँगPune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅपPune Porsche Car Accident Accused Rap Song :जामीन मिळाल्याचा घमंड,  दोघांना चिरडल्यानंतर आरोपीचा रॅप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
Embed widget