एक्स्प्लोर

Maharashtra Unlock : सगळे निर्बंध लवकरच उठवू, कुणाचंही नुकसान होऊ देणार नाही: आदित्य ठाकरे

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे  (aaditya Thackeray) यांनी पूर्णपणे अनलॉकबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. सगळे निर्बंध लवकरच उठवू, कुणाचंही नुकसान होऊ देणार नाही, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

Aaditya Thackeray On Maharashtra Lockdown : राज्यातील कोरोनाचे (Maharashtra Corona Update) आकडे दिवसेंदिवस कमी येत असल्यानं आता पूर्णपणे निर्बंध हटवण्याबाबत चर्चा सुरु आहे. यासंदर्भात राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya Thackeray) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सगळे निर्बंध लवकरच उठवू, कुणाचंही नुकसान होऊ देणार नाही, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. मुंबई पालिकेच्या शाळा दोन मार्चपासून पूर्ण क्षमतेनं सुरु होणार, असल्याची माहिती देखील आदित्य ठाकरेंनी दिली.  

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क फेस्टिव्हलला (shivaji park festival) कालपासून सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय चळवळीचं मुख्य केंद्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्काचा गौरव करण्यासाठी या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. या फेस्टिव्हलच्या निमित्तानं मुंबईकरांना कला, क्रीडा आणि मराठमोळ्या संस्कृतीचा आनंद घेताना महाराष्ट्राच्या इतिहासाचा अनुभव घेता येईल. हा फेस्टिव्हल तीन दिवस सुरु राहणार आहे.   

शिवाजी पार्क फेस्टिवलला आदित्य ठाकरेंनी शुक्रवारी रात्री उपस्थिती लावली. यावेळी शिवसेनेचे स्थानिक खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, नवाब मलिकांवरची कारवाई हे भाजपची निवडणूक नीती आहे. नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ केलेल्या आंदोलनात शिवसेनेचेही नेते होते, काहीजण प्रचारात होते, काही आंगणेवाडी जत्रेला गेले होते, पण आम्ही सर्व एक आहोत, असंही ते म्हणाले. 

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांबाबत बोलताना ते म्हणाले की,  आम्ही विद्यार्थ्यांना आणि अडकलेल्या नागरीकांना तात्काळ परत बोलवण्याची विनंती केली आहे. पण तो निर्णय भारत सरकारचा आहे. 

मुंबईत अखेर पूर्ण क्षमतेनं शाळा सुरु होणार

कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व बोर्डच्या सर्व माध्यमाच्या नगरबाहय विभागाच्या सर्व शाळा तसेच विशेष व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्व शाळा, मैदानी खेळ व शाळेचे विविध शैक्षणिक उपक्रम यासह पूर्णवेळ व पूर्णक्षमतेने सुरु करण्यास मंजुरी प्राप्त झाली आहे. 2 मार्च पासून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व  शाळा कोविड-19 पूर्वीच्या वेळापत्रकानुसार पूर्णवेळ व पूर्णक्षमतेने ऑफलाईन पद्धतीने सुरु होणार आहेत. यासंदर्भात परिपत्रक बीएमसीकडून जारी करण्यात आलं आहे.  

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप, म्हणाले, मी 1980 पासून सोबत होतो
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप, म्हणाले, मी 1980 पासून सोबत होतो
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Embed widget