दिवाळीच्या सुट्टीमध्ये शेगाव, शिर्डी देवदर्शनाला जाताय, मग ही बातमी वाचाच...
Maharashtra Temples Update : दिवाळीच्या सुट्टी आणि सणासुदीच्या काळात भाविकांचा भर देवदर्शनावर असतो. दिवाळीसाठी काही संस्थानांनी स्थानिक स्तरावर नियमांमध्ये काही बदल केले आहेत.
Maharashtra Temples Update : दिवाळीच्या सुट्टी आणि सणासुदीच्या काळात भाविकांचा भर देवदर्शनावर असतो. यंदा कोरोनाचे निर्बंध काहीअंशी शिथिल केल्यानंतर मंदिरं दर्शनासाठी खुली केली आहेत. मात्र त्यासाठी सर्वच देवस्थानाच्या ठिकाणी कोरोनाचे नियम मात्र पाळावे लागणार आहेत. मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगसह अन्य कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन भाविकांना करावे लागणार आहे.
अशात दिवाळीसाठी काही संस्थानांनी स्थानिक स्तरावर नियमांमध्ये काही बदल केले आहेत. शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात फक्त ऑनलाइन पासधारक भक्तांनाच दर्शनासाठी प्रवेश मिळणार आहे. दिवाळी सुटीच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. शेगावमध्ये दररोज फक्त नऊ हजार भाविकांनाच दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. दहा वर्षाखालील व साठ वर्षावरील नागरिकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.त्यामुळं दूरवरुन येणाऱ्या भक्तांनी आधीच ऑनलाइन पास काढून यावे, असे आवाहन मंदिर संस्थानच्या तीनं करण्यात येणार आहे.
शिर्डीत ऑफलाईन पास सेवा?
लवकरच शिर्डीत ऑफलाईन पास सेवाही सुरू होणार असुन दिवाळीच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानने तयारी केलीय.ऑफलाईन पास आणि भक्तांसाठी प्रसादालाय सुद्धा सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव शासनाला पाठवल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे सुचनेवरून साईदर्शनासाठी ऑनलाइन पास सक्तीचे करण्यात आले होते त्यामुळे अनेक भाविकांची गैरसोय होतेय. तर ऑनलाइन पासच्या नावाखाली गोरखधंदा सुरू झालाय. संस्थानने पासचा गैरव्यवहार करणाऱ्या 5 जणांवर कारवाई केली असून पुढे देखील कठोर कारवाई करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी सांगितलं आहे.
अक्कलकोट येथील वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरात कोविड-19 ची नियमावली व शासनाचे निर्देश पाळून भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. दिवाळीत या नियमांचे पालन करत भाविकांना दर्शन दिलं जाणार आहे.