(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shirdi Sai Baba: साईभक्तांसाठी आनंदाची बातमी, लवकरच शिर्डीच्या साईबाबांचे ऑफलाईन दर्शन घेता येणार
Shirdi Sai Baba: साई मंदिरात दररोज 15 हजार भाविकांना प्रवेश दिला जातोय. म्हणजे दर तासाला जवळपास 1 हजार 150 भाविक दर्शन घेतायेत. दर्शनासाठी जाताना भाविकांना हार-प्रसाद घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली.
Shirdi Sai Baba: महाराष्ट्रात (Maharashtra) आलेल्या कोरोनाच्या (Coronavirus) संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे पुन्हा एकदा बंद करण्यात आली. मात्र, राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी घट पाहता घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे भक्तांसाठी खुली करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. कोरोनाचा धोका कायम असल्याने सर्व धार्मिक स्थळांसाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली. त्यानुसार, महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले शिर्डीतील साई मंदिर खुले करण्यात आले असून साईभक्तांना (Shirdi Sai Baba Temple) ऑनलाईन प्रवेश दिला जातोय. मात्र, ऑनलाईन पासच्या नावाखाली शिर्डीत गोरखधंदा सुरू झाला आणि भाविकांची गैरसोय होत असल्याचे साई संस्थानच्या लक्षात आले. ज्यामुळे साई संस्थानने साई मंदिरात ऑफलाईन पास सेवा सुरू करण्याची तयारी दर्शवलीय.
Diwali 2021 : नाशिककरांच्या दिवाळीची जल्लोषात सुरूवात, भारतातील वैविध्यपूर्ण नृत्य रसिकांसमोर सादर
कोरोना महामारीच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सरकारच्या वतीने लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनमुळे 17 मार्चपासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले. त्यानंतर राज्य सरकारने 14 नोव्हेंबरला पाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे खुली करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, पाडव्याच्या मुहूर्तावर शिर्डी येथील मंदिर उघडण्यात आले. त्यानंतर शिर्डीच्या साई मंदिरातही भाविकांना ऑनलाईन प्रवेशाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, या काळात भाविकांची गैरसोय होत असल्याचे साई संस्थानच्या लक्षात येताच त्यांनी भाविकांना ऑफलाईन प्रवेश सुरु करण्याची तयारी दाखवली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिर्डीत लवकरच ऑफलाईन पास सेवाही सुरू होणार असुन दिवाळीच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानने तयारी केली. ऑफलाईन पास आणि भक्तांसाठी प्रसादालय सुद्धा सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या सुचनेवरून साईदर्शनासाठी ऑनलाइन पास सक्तीचे करण्यात आले. मात्र, या काळात अनेक भाविकांची गैरसोय होत होती. एवढेच नव्हेतर, ऑनलाईन पासच्या नावाखाली शिर्डीत गोरखधंदा सुरू असल्याचे अनेक प्रकार समोर आले. दरम्यान, ऑनलाईन पासचा गैरव्यव्हार करणाऱ्या 5 जणांविरोधात संस्थानकडून कारवाई करण्यात आली, असेही भाग्यश्री बनायत यांनी सांगितले.
साई मंदिरात दररोज 15 हजार भाविकांना प्रवेश दिला जात आहे. म्हणजे दर तासाला जवळपास 1 हजार 150 भाविक दर्शन घेतायेत. दर्शनासाठी जाताना भाविकांना हार-प्रसाद घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली. त्याचप्रमाणे, मंदिरातील काकड आरतीपासून शेजारतीपर्यंत सर्व आरतींसाठी फक्त 90 साईभक्तांना परवानगी देण्यात आली.