एक्स्प्लोर
Advertisement
राणेंच्या पक्षाचा रास्तारोको, सिंधुदुर्गात 'लिंबू-मिरची' आंदोलन
'चांदा ते बांदा, सुरक्षित प्रवासासाठी लिंबू मिरची बांधा', अशा घोषणा देत राणेंच्या कार्यकर्त्यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचा निषेध केला.
सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेच्या प्रश्नावर नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने सिंधुदुर्गात 'लिंबू-मिरची' आंदोलन केले. कुडाळमधील झाराप येथे रास्ता रोको करत मुंबई-गोवा महामार्ग महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रोखला.
मुंबई गोवा महामार्गावरील प्रत्येक गाडीला लिंबू मिरच्या बांधल्या. 'चांदा ते बांदा, सुरक्षित प्रवासासाठी लिंबू मिरची बांधा', अशा घोषणा देत राणेंच्या कार्यकर्त्यांनी गाड्यांना लिंबू-मिरच्या बांधल्या आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचा निषेध केला.
"गेल्या तीन वर्षांपासून सिंधुदुर्गातील रस्त्यांची दुरवस्था आहे. मात्र तरीही पालकमंत्री या रस्त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे प्रत्येक गाडीवर लिंबू-मिरची बांधून पालकमंत्र्यांचा निषेध करत आहोत.", असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. शिवाय, पुढच्या आठ ते दहा दिवसात मुंबई गोवा महामार्ग सुस्थितीत झाला नाही, तर महामार्ग चक्का जाम करु, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या रास्तारोकोमुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement