एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महावितरणला विक्रमी 30 हजार कोटींचा तोटा, तुमचं लाईट बिल वाढणार!
गेल्या दीड वर्षात महावितरण कंपनीला तब्बल 30 हजार 842 कोटींचा विक्रमी तोटा झाला आहे. हा तोटा भरुन काढण्यासाठी आता ग्राहकांच्या खिशाला कात्री लावली जाण्याची शक्यता आहे.
लातूर: तुमचं वीज बिल आजवर हजार रुपये येत असेल, तर ते आता 1 हजार 350 रुपये येणार आहे. कारण तुम्हाला वीज पुरवणाऱ्या महावितरणला तब्बल 30 हजार 842 कोटींचा तोटा झाला आहे. आणि हाच तोटा पुन्हा ग्राहकांकडूनच भरुन काढण्यासाठी कंपनीने जबरदस्त दरवाढ प्रस्तावित केली आहे.
गेल्या दीड वर्षात महावितरण कंपनीला तब्बल 30 हजार 842 कोटींचा विक्रमी तोटा झाला आहे. हा तोटा भरुन काढण्यासाठी आता ग्राहकांच्या खिशाला कात्री लावली जाण्याची शक्यता आहे.
महावितरणनं घरगुती वापरासाठी 5 टक्के तर कृषी आणि इतर वापरासाठी 35 टक्के इतक्या दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला मोठा भुर्दंड सहन करावा लागू शकतो.
वीज आहे पण खरेदीदार नाही
महाराष्ट्रातल्या अनेक मोठ्या उद्योगांनी महागड्या विजेमुळे महावितरणच्या विजेला रामराम केला आहे. त्यामुळे कंपनीकडे वीज आहे पण खरेदीदार नाही अशी अवस्था झाली आहे. परिणामी महाराष्ट्रातली आजवरची सर्वात मोठी वीजदरवाढ करण्याची मागणी कंपनीने वीज नियामक आयोगाकडे केली आहे.
विजय मल्ल्या....निरव मोदी....डीएकसे अशा सगळ्या महाभागांना मागं टाकणारा कारभार महाराष्ट्रात घरोघरी वीज पुरवणाऱ्या महावितरण कंपनीनं करुन ठेवला आहे. एअर इंडिया प्रमाण महावितरण पूर्ण डब्यात गेली आहे.
महावितरणला तब्बल 30 हजार 842 कोटींचा तोटा झाला आहे. पुन्हा ग्राहकांकडूनच तोटा भरुन काढण्यासाठी कंपनीने जबरदस्त दरवाढ प्रस्तावित केली आहे.
महावितरण डब्यात का गेली?
- लोड शेडिंगच्या काळानंतर आलेल्या नव्या प्रकल्पांशी केलेले दीर्घ मुदतीचे करार.
- या कारारामुळे वीज विकत न घेताच खासगी कंपन्यांना द्यावे लागणारे स्थिर चार्जेस.
- औरंगाबाद, कल्याण, नागपूर, पुणे या विभागीय कार्यालयांची निर्मिती.
- विभागीय कार्यालयांसाठी संचालक, अधिकाऱ्यांची पदं आणि त्यावर होणारा ५०० कोटींचा खर्च.
- महावितरणमध्ये वाढलेलं अतांत्रिक लोकांचं वर्चस्व
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement