एक्स्प्लोर

आता खातेवाटपाच्या चर्चा, विखे पाटलांना राज्य उत्पादन, शेलारांना गृहनिर्माण, बोंडेंना कृषी खातं मिळण्याची शक्यता

शपथ घेतलेल्या मंत्र्यांना आता कुठलं खातं मिळणार अशी चर्चा सुरु आहे. यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांना पणन, राज्य उत्पादन शुल्क , मदत पुनर्वसन खातं मिळण्याची शक्यता आहे. तर आशिष शेलार यांना गृहनिर्माण खात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई :   राज्याच्या मंत्रिमंडळात आज 13 नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला. त्यामध्ये 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्री असून त्यांना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी  राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, ॲड. आशिष शेलार, डॉ. संजय कुटे, डॉ. सुरेश खाडे, डॉ.अनिल बोंडे, प्रा. डॉ. अशोक उईके, प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. तर राज्यमंत्री म्हणून सर्वश्री योगेश सागर, अविनाश महातेकर, संजय (बाळा) भेगडे, डॉ. परिणय फुके आणि अतुल सावे यांनी शपथ घेतली. महातेकर यांनी गांभीर्यपूर्वक शपथ घेतली तर अन्य सदस्यांनी ईश्वरसाक्ष शपथ घेतली. शपथ घेतलेल्या मंत्र्यांना आता कुठलं खातं मिळणार अशी चर्चा सुरु आहे. यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांना पणन, राज्य उत्पादन शुल्क, मदत पुनर्वसन खातं मिळण्याची शक्यता आहे. तर आशिष शेलार यांना महेतांच्या जागी गृहनिर्माण खात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील डॉ. अनिल बोंडे यांना कृषी खातं मिळण्याची चिन्हे आहेत. नुकतेच शिवसेनेत आलेल्या जयदत्त क्षिरसागर यांना सार्वजनिक आरोग्य खात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. या खात्याची अतिरिक्त जबाबदारी सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर संभाव्य खातेवाटप कॅबिनेट मंत्री :- 1) राधाकृष्ण विखे पाटील - (जिल्हा - अहमदनगर) (भाजपा) : पणन / राज्य उत्पादन शुल्क / मदत पुनर्वसन 2) जयदत्त क्षिरसागर - (जिल्हा - बीड) (शिवसेना) - सार्वजनिक आरोग्य 3) आशिष शेलार (जिल्हा - मुंबई)  (भाजपा) - गृहनिर्माण 4) डॉ. संजय कुटे (जिल्हा - बुलडाणा) ( भाजपा) - ??? 5) डॉ. सुरेश खाडे  (जिल्हा - सांगली) (भाजपा) - सामाजिक न्याय विभाग 6) डॉ. अनिल बोंडे (जिल्हा - अमरावती) (भाजपा) - कृषी 7) डॉ. अशोक उईके (जिल्हा - यवतमाळ)  (भाजपा) - आदिवासी विकास 8) डॉ. तानाजी सावंत  (जिल्हा - यवतमाळ) (शिवसेना) - ??? राज्यमंत्री 1) योगेश सागर (जिल्हा - मुंबई)  (राज्यमंत्री) (भाजपा) - सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री 2) अविनाश महातेकर (जिल्हा - मुंबई ) (आरपीआय) - सामाजिक न्याय राज्यमंत्री 3) संजय भेगडे ( जिल्हा - पुणे) (भाजपा) - ??? 4) डॉ. परिणय फुके (जिल्हा - भंडारा) ( भाजपा) -  आदिवासी विकास व वने राज्यमंत्री 5) अतुल सावे (जिल्हा औरंगाबाद) ( भाजपा) - अल्पसंख्याक राज्यमंत्री नव्या मंत्र्यांचा थोडक्यात परिचय  राधाकृष्ण विखे-पाटील (भाजप) राज्याच्या राजकारणातील मोठं नाव काँग्रेसच्या काळात शिक्षण, दळणवळण, कृषी मंत्री 2014 ते 4 जून 2019 पर्यंत विधानसभेचे विरोधी पक्षनेते उद्योग, सहकार, शिक्षण क्षेत्रात भरीव काम काँग्रेसच्या राजीनामा देऊन भाजपशी जवळीक आशिष शेलार (भाजप) अभाविप सचिव, भाजयुमो अध्यक्ष म्हणून सक्रिय राजकारणाला सुरुवात मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून काम सध्या वांद्रे पश्चिम मधून आमदार मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला तुल्यबळ टक्कर जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) मराठवाड्यातील मोठं राजकीय नाव पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात आघाडी सरकारच्या काळात अनेक मंत्रिपदं भूषवली उर्जा, पर्यटन, उच्च व तंत्र शिक्षण, सार्वजनिक बांधकाम मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेत प्रवेश तानाजी सावंत (शिवसेना) जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे शिक्षण क्षेत्रात मोठं नाव शिवसेनेकडून विधान परिषदेवर आमदार शिवसेनेचे उस्मानाबाद, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख ‘शिव जल क्रांती’च्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यात काम अतुल सावे (भाजप) सवेरा ग्रुप ऑफ कंपनीद्वारे उद्योग क्षेत्रात काम औरंगाबाद भाजप शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष म्हणून काम सध्या औरंगाबाद पूर्वमधून आमदार सुरेश खाडे (भाजप) सांगली जिल्हा भाजप अध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम सांगली जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला असताना भाजप रुजवण्याचं काम सलग तीन वेळा भाजपकडून आमदार परिणय फुके (भाजप) वयाच्या 26 व्या वर्षी नागपूर नगरपालिकेत नगर सेवक 2016 मध्ये भाजपकडून विधानपरिषदेवर मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी ओळख अविनाश महातेकर (भाजप) दलित पॅँथरचे संस्थापक सदस्य 1990 मध्ये प्रकाश आंबेडकरांना सोडून आठवलेंच्या गटात भारिप बहुजन महासंघाचे सचिव म्हणून काम रिपब्लिकर पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस आरपीआयची थिंक टँक म्हणून ओळख अनिल बोंडे (भाजप) मोर्शी मतदार संघातून आमदार 2002 ते 2005 पर्यंत अमरावती शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष 2009 शिवसेनेनं तिकीट नाकारल्यानं अपक्ष म्हणून रिंगणात आणि विजयी 26 ऑगस्ट 2014 मध्ये भाजपात प्रवेश संजय उर्फ बाळा भेगडे (भाजप) मावळ मतदारसंघात भाजपकडून सलग दोन वेळा आमदार भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस योगेश सागर (भाजप) चारकोप मतदारसंघातून भाजपचे आमदार सलग दोन वेळा विधानसभेवर विधानसभेत तालिका अध्यक्ष म्हणून उत्तम काम डॉ. संजय कुटे (भाजप) जळगावच्या जामोद मतदारसंघातून विधानसभेचे आमदार 2014 मध्ये महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस 2010 मध्ये बुलडाणा भाजपचे अध्यक्ष डॉ. अशोक उईके (भाजप) यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव विधानसभा मतदारसंघातून  आमदार नगरसेवक ते आमदार आता मंत्री असा प्रवास बुलढाणा नगरपालिकेत 1998 साली नगरसेवक विधिमंडळच्या आदिवासी विकास समितीचे प्रमुख अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे शिवाजी शिक्षणसंस्थेतील कॉलेजचे प्राचार्य सुद्धा सर्व सामान्य कार्यकर्त्यांत मिसळणारे म्हणून त्यांची ओळख

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget