एक्स्प्लोर

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, जाणून घ्या 13 नव्या मंत्र्यांविषयी

यावेळी राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, ॲड. आशिष शेलार, डॉ. संजय कुटे, डॉ. सुरेश खाडे, डॉ.अनिल बोंडे, प्रा. डॉ. अशोक उईके, प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली.

मुंबई :   राज्याच्या मंत्रिमंडळात आज 13 नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला. त्यामध्ये 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्री असून त्यांना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राजभवनाच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्यास मंत्रिमंडळातील सदस्य, नवनियुक्त मंत्र्यांचे कुटुंबीय,  यांच्यासह मुख्य सचिव अजोय मेहता, राज्य प्रशासनातील अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी  राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, ॲड. आशिष शेलार, डॉ. संजय कुटे, डॉ. सुरेश खाडे, डॉ.अनिल बोंडे, प्रा. डॉ. अशोक उईके, प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. तर राज्यमंत्री म्हणून सर्वश्री योगेश सागर, अविनाश महातेकर, संजय (बाळा) भेगडे, डॉ. परिणय फुके आणि अतुल सावे यांनी शपथ घेतली. महातेकर यांनी गांभीर्यपूर्वक शपथ घेतली तर अन्य सदस्यांनी ईश्वरसाक्ष शपथ घेतली. नव्या मंत्र्यांचा थोडक्यात परिचय  राधाकृष्ण विखे-पाटील (भाजप) राज्याच्या राजकारणातील मोठं नाव काँग्रेसच्या काळात शिक्षण, दळणवळण, कृषी मंत्री 2014 ते 4 जून 2019 पर्यंत विधानसभेचे विरोधी पक्षनेते उद्योग, सहकार, शिक्षण क्षेत्रात भरीव काम काँग्रेसच्या राजीनामा देऊन भाजपशी जवळीक आशिष शेलार (भाजप) अभाविप सचिव, भाजयुमो अध्यक्ष म्हणून सक्रिय राजकारणाला सुरुवात मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून काम सध्या वांद्रे पश्चिम मधून आमदार मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला तुल्यबळ टक्कर जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) मराठवाड्यातील मोठं राजकीय नाव पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात आघाडी सरकारच्या काळात अनेक मंत्रिपदं भूषवली उर्जा, पर्यटन, उच्च व तंत्र शिक्षण, सार्वजनिक बांधकाम मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेत प्रवेश तानाजी सावंत (शिवसेना) जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे शिक्षण क्षेत्रात मोठं नाव शिवसेनेकडून विधान परिषदेवर आमदार शिवसेनेचे उस्मानाबाद, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख ‘शिव जल क्रांती’च्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यात काम अतुल सावे (भाजप) सवेरा ग्रुप ऑफ कंपनीद्वारे उद्योग क्षेत्रात काम औरंगाबाद भाजप शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष म्हणून काम सध्या औरंगाबाद पूर्वमधून आमदार सुरेश खाडे (भाजप) सांगली जिल्हा भाजप अध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम सांगली जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला असताना भाजप रुजवण्याचं काम सलग तीन वेळा भाजपकडून आमदार परिणय फुके (भाजप) वयाच्या 26 व्या वर्षी नागपूर नगरपालिकेत नगर सेवक 2016 मध्ये भाजपकडून विधानपरिषदेवर मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी ओळख अविनाश महातेकर (भाजप) दलित पॅँथरचे संस्थापक सदस्य 1990 मध्ये प्रकाश आंबेडकरांना सोडून आठवलेंच्या गटात भारिप बहुजन महासंघाचे सचिव म्हणून काम रिपब्लिकर पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस आरपीआयची थिंक टँक म्हणून ओळख अनिल बोंडे (भाजप) मोर्शी मतदार संघातून आमदार 2002 ते 2005 पर्यंत अमरावती शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष 2009 शिवसेनेनं तिकीट नाकारल्यानं अपक्ष म्हणून रिंगणात आणि विजयी 26 ऑगस्ट 2014 मध्ये भाजपात प्रवेश संजय उर्फ बाळा भेगडे (भाजप) मावळ मतदारसंघात भाजपकडून सलग दोन वेळा आमदार भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस योगेश सागर (भाजप) चारकोप मतदारसंघातून भाजपचे आमदार सलग दोन वेळा विधानसभेवर विधानसभेत तालिका अध्यक्ष म्हणून उत्तम काम डॉ. संजय कुटे (भाजप) जळगावच्या जामोद मतदारसंघातून विधानसभेचे आमदार 2014 मध्ये महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस 2010 मध्ये बुलडाणा भाजपचे अध्यक्ष डॉ. अशोक उईके (भाजप) यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव विधानसभा मतदारसंघातून  आमदार नगरसेवक ते आमदार आता मंत्री असा प्रवास बुलढाणा नगरपालिकेत 1998 साली नगरसेवक विधिमंडळच्या आदिवासी विकास समितीचे प्रमुख अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे शिवाजी शिक्षणसंस्थेतील कॉलेजचे प्राचार्य सुद्धा सर्व सामान्य कार्यकर्त्यांत मिसळणारे म्हणून त्यांची ओळख
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
Embed widget