एक्स्प्लोर

उच्च स्तरीय समितीच्या अहवालावर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अभिप्रायावर त्यांची स्वाक्षरी का नाही?, हायकोर्टाचा सवाल

ST Strike: एसटी विलिनीकरणाचा निर्णय धोरणात्मक असल्याने त्यासाठी वेळ लागेल अशी माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे.

मुंबई :  वेतन, एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण आदी मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारीही ठोस तोडगा निघालेला नाही. या सुनावणीत त्रिसदस्यीय समितीच्या अहवालासह त्यावरील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अभिप्राय सीलबंद लिफाफ्यात कोर्टापुढे सादर करण्यात आला. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या अभिप्रायावर त्यांची स्वाक्षरी नसल्यानं हा त्यांच्याच अभिप्राय आहे हे मानायचं कसं? असा सवाल उपस्थित करत त्याबाबत पुरावा न्यायालयात सादर करण्याचे निर्देश हायकोर्टानं राज्य सरकारला दिले आहेत. तसेच हा गोपनीय अहवाल इतर प्रतिवाद्यांसह सार्वजनिक करायचा का?, यावरही खुलासा करण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत.

दरम्यान उच्च स्तरीय समितीचा सीलबंद अहवाल हायकोर्टापुढे सादर करताना यातील केवळ एक मुद्दा सोडला तर कामगारांच्या इतर सर्व मागण्या पूर्ण करण्यात आल्याची माहिती सरकारी वकिलांनी हायकोर्टात दिली. तसेच सेवाजेष्ठतेनुसार कामगारांना पगारवाढ, बोनस, थकीत वेतनही राज्य सरकारनं सरकारी तिजोरीतून दिलं आहे. मात्र तरीही अद्याप 55 हजार कर्मचारी संपावर आहेत, ज्यामुळे ग्रामीण भागांत एसटीची सेवा अद्याप विसेकळीतच आहे. एसटी कर्मचा-यांच्या सरकारी कर्मचा-यांमध्ये विलिनीकरणाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, हा एक धोरणात्मक निर्णय आहे आणि त्यासाठी वेळ लागेल असंही सरकारी वकील एस. नायडू पुढे म्हणाले. मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी पार पडली.

राज्य परिवहन महामंडळ सतत तोट्यात असल्याचा फटका कर्मचाऱ्यांनाही बसत असून एसटी तोट्यात असल्याचं कारण देत महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वेतन वाढ नसल्यानं बिकट परिस्थितीतही महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून पूर्णत्वास नेत नाही. त्यामुळे आता एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याशिवाय पर्याय नाही, अशी मागणी कामगार संघटनेकडून करण्यात आली असून त्यांनी गेल्या तीन महिन्यांपासून संप पुकारलेला आहे. त्याविरोधात एसटी महामंडळानं तातडीने रीट आणि अवमान याचिकेद्वारे उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांसह, अप्पर मुख्य सचिव आणि परिवहन विभागाच्या प्रधान सचिवाचा समावेश असलेली त्रिसदस्यीय समिती स्थापना करण्यात आली आहे. या समितीनं सर्व कामगार संघटना तसेच महामंडळाच्या कर्मचा-यांचं म्हणणं ऐकून घेत त्यांनी आपला अहवाल सादर केला आहे.

संबंधित बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 4 डिसेंबर 2024 : ABP MajhaSpecial Report Mahayuti Oath Ceremony  : महायुतीत कुणाचा स्ट्राईक रेट किती? कोण होणार मंत्री?Maharashtra New CM : Eknath Shinde आणि Devendra Fadnavis यांची  बंद दाराआड चर्चा?  Special ReportABP Majha Headlines : 6.30 AM  : 4 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Embed widget