एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra ST Bus Accident : 'असा' घडला एसटी बसचा अपघात, जाणून घ्या इंदूर अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम
Maharashtra Bus Accident: मध्य प्रदेशातील धारमध्ये महाराष्ट्राच्या एसटी बसला भीषण अपघात झाला. ही एसटी बस नर्मदा नदीत कोसळली.
ST Bus Accident : मध्य प्रदेशातल्या इंदूरहून जळगावातल्या अमळनेरकडे येणारी एसटी खरगोनमध्ये नर्मदा नदीत कोसळली. या भीषण अपघातात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यापैकी आठ मृतदेहांची ओळख पटली आहे. ज्यात चार जण जळगावचे, एक जण मूर्तीजापूरचे तर दोन जण राजस्थानचे असल्याची माहिती मिळत आहे.
जाणून घ्या इंदूर अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची अमळनेर (जळगाव जिल्हा) आगाराची इंदोर- अमळनेर बस क्रमांक एम एच 40 एन 9848 ही आज सकाळी 7.30 सुमारास इंदोर येथून मार्गस्थ झाली.
- त्यानंतर मध्य प्रदेशमधील खलघाट आणि ठिगरी मधील नर्मदा नदीचे पुलावर सदर बस अपघातग्रस्त झाल्यानंतर नर्मदा नदीत कोसळली.
- सदर दुर्घटनेची माहिती मिळताच एसटी महामंडळाने स्थानिक जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधत मदत व बचाव कार्यास सुरूवात झाली
- अपघाताबाबत एसटी महामंडळाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले. अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने 022-23023940 हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित करण्यात आला.
- स्थानिक जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या बचावकार्यात 12 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.
- एसटीतर्फे मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश
- मध्यप्रदेश सरकारकडूनही अपघातग्रस्तांना मदत, शिवराजसिंह सरकारकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत दिली
- अपघातातील मृतांच्या वारसांना केंद्र सरकारकडून प्रत्येकी दोन लाखांची मदत तर जखमींना प्रत्येकी 50 हजारांच्या मदतीची घोषणा करण्यात आली
- सर्व मृतदेह धामणोत येथील ग्रामीण रूग्णालयात ठेवण्यात आले असून अजूनही शोधमोहिम सुरु आहे
- अपघाताचे कारण शोधण्यासाठी एक समिती नेमण्यात आली असून या समितीला तातडीने चौकशी करण्यास सांगितले आहे.
- अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून मदत यासोबत भाजपनेते गिरीश महाजन घटनास्थळी जाणार आहेत. तर, मध्य प्रदेश सरकार दोन्ही राज्यांच्या समन्वयासाठी एका मंत्र्याची नियुक्ती करणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement