School Bandh : राज्यभरात शिक्षकांचं मोठं आंदोलन; पुण्यासह राज्यातील 60 हजार शाळा बंद राहणार, तोडगा न निघाल्यास हिवाळी अधिवेशनात धरणे आंदोलनाचा इशारा, काय आहेत मागण्या?
School Bandh : राज्यभरातील जवळपास दीड हजार शाळा या बंद राहतील अशी माहिती आहे त्यामध्ये काही विनाअनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत सुद्धा समावेश असल्याची माहिती शिक्षक संघटनांनी दिली आहे.

पुणे: टीईटी परीक्षेच्या विरोधात आज संपूर्ण राज्यभर शिक्षक रस्त्यावर(Maharashtra Schools Closed Today) उतरले आहेत. टीईटी सक्ती आणि 15 मार्च 2024 संच मान्यतेच्या जीआरच्या विरोधात राज्यातील शिक्षक शाळा बंद आंदोलनात सहभागी होत आहेत. मुंबईतील 200 ते 300 च्या जवळपास मुख्यत्वे खाजगी अनुदानित शाळा बंद राहणार असल्याचा शिक्षक संघटनांचा दावा आहे. राज्यभरातील जवळपास दीड हजार शाळा या बंद (Maharashtra Schools Closed Today) राहतील अशी माहिती आहे त्यामध्ये काही विनाअनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत सुद्धा समावेश असल्याची माहिती शिक्षक संघटनांनी दिली आहे.(Maharashtra Schools Closed Today)
School Bandh : टीईटी सक्तीमुळे शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण
टीईटी सक्तीमुळे शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 53 पेक्षा कमी वय असणाऱ्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सक्ती केली आहे. यावर राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी व आपली भूमिका मांडावी अशी मागणी शिक्षक संघटनांची आहे. त्यासोबतच शैक्षणिक वर्षाच्या मध्यावधीत संचमान्यतेचे अन्यायकारक निकष लावून हजारो शिक्षकांना अतिरिक्त ठरवले जात आहे. विषयाला शिक्षक उरणार नाही. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्याने शाळांचे संपूर्ण नियोजन कोलमडणार आहे. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी सर्व संघटनांनी केलेली आहे. या सगळ्याच्या विरोधात आज शाळा बंद आंदोलन शिक्षकांनी पुकारला आहे.
School Bandh : शाळा बंद राहिल्यास एक दिवसाचे वेतन कपात करण्याची कार्यवाही करणार
यामध्ये प्रामुख्याने खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांनी शाळा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये काही प्रमाणात विनाअनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा सुद्धा समावेश आहे. शिक्षक भारती, मुंबई मुख्याध्यापक संघटना, संस्थाचालक संघटना महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना अशा विविध संघटनांनी या शाळा बंदला पाठिंबा दिला आहे. या संदर्भात शिक्षण संचालकांनी पत्र काढले असून आज कुठल्याही प्रकारच्या शाळा बंद राहणार नसल्याचं शिक्षक संचालकांनी सांगितलं असून कुठल्या प्रकारची शाळा बंद राहणार नाही याची आपल्या स्तरावर दक्षता घ्यावी आणि शाळा बंद राहिल्यास त्या ठिकाणच्या मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचे वेतन कपात करण्याची कार्यवाही करावी अशा प्रकारच्या सूचना शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालकांना देण्यात आल्या आहेत.
School Bandh : शाळा बंद आंदोलनास मुंबई मुख्याध्यापक संघटनेचा पाठिंबा
राज्यातील शिक्षक बांधवांच्या हक्कासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने आज (शुक्रवार दि. 5 डिसेंबर 2025) शाळा बंद आंदोलनाला मुंबई मुख्याध्यापक संघटनेने जाहीर पाठिंबा दिला असल्याचे मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले. या निर्णयामुळे मुंबईतील शाळा उद्या बंद असणार आहेत, उद्या मुंबई मुख्याध्यापक संघटनेच्यावतीने मुंबई विभाग शिक्षण उपसंचालकांना निवेदन देण्यात येणार असून या निवेदनात
1) सरसकट सर्व शिक्षकांसाठी TET उत्तीर्ण होण्याची घातलेली अट रद्द करणे.
2) 15 मार्च 2024 चा अन्यायकारक शासननिर्णय रद्द करणे.
3) 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त सर्व विभागातील शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करणे.
4) शिक्षकांना 10-20-30 वर्षाची आश्वासीत प्रगती योजना लागू करणे.
5) शिक्षणसेवक पद रद्द करून सुरुवातीपासून शिक्षकांची कायमस्वरूपी नेमणूक करणे या सह अन्य मागण्यांचा समावेश असणार असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.या आंदोलनात संस्थाचालक संघटना तसेच इतर सर्व संघटना सहभागी होणार आहेत
School Bandh : तोडगा न निघाल्यास 10 डिसेंबरला धरणे आंदोलन
शिक्षक संघटनासोबत नागपूर येथे पार पडलेल्या बैठकीत शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून राज्य शासनाची भूमिका स्पष्ट करण्याचे आश्वासन दिले होते परंतु त्याबाबत कोणतेही परिपत्रक शिक्षण विभागाने काढलेले नाही. शैक्षणिक वर्षाच्या मध्यावधीत संचमान्यतेचे अन्यायकारक निकष लावून हजारो शिक्षकांना अतिरिक्त ठरवले जात आहे. विषयाला शिक्षक उरणार नाही. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्याने शाळांचे संपूर्ण नियोजन कोलमडणार आहे. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी सर्व संघटनांनी केलेली आहे. शिक्षण विभागाने टीईटी सक्ती व अन्यायकारक संच मान्यतेचा जीआर रद्द करण्याबाबत ठोस निर्णय घेऊन संघटनांना चर्चेसाठी न बोलावल्यास नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात 10 डिसेंबरला शिक्षक भारती संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल अशी भूमिका घेतली आहे.

























