देवराष्ट्रेच्या दत्तात्रय लोहार यांच्या मिनी जिप्सीचा गीतातून जागर, सुप्रसिद्ध गीतकार सरुताई धडे यांनी रचले गीत
देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार यांनी बनवलेल्या मिनी जिप्सीवर सुप्रसिद्ध गीतकार सरुताई धडे यांनी लोकगीत बनवले आहे. सरुताई यांनी मिनी जिप्सीचे आणि दत्ताभाऊंच्या कल्पकतेचे लोकगीतातून कौतुक केले.
सांगली : गाडी पॉम पॉम..गाडी पॉम पॉम, कशी वाजते मोटार? या गाडीला दत्ताभाऊ डायवर हे गीत बनलंय सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार यांनी बनवलेल्या मिनी जिप्सीवर. सुप्रसिद्ध गीतकार सरुताई धडे यांनी हे लोकगीत बनवले आहे. सरुताई यांनी मिनी जिप्सीचे आणि दत्ताभाऊंच्या कल्पकतेचे या लोकगीतातून कौतुक केले आहे.
सांगली जिल्ह्यातील पलूस येथे राहणाऱ्या सरस्वती उर्फ सरुताई धडे यांनी दत्तात्रय लोहार यांच्या घरी भेट दिली आणि या मिनी जिप्सीवरील गाणे गायले. देवराष्ट्रे हे स्व. यशवंतराव चव्हाण यांचे जन्मगाव आहे. याच गावातील दत्तात्रय लोहार यांनी मिनी जिप्सी तयार केली आहे. या मिनी जिप्सीची सद्या संपूर्ण देशभर चर्चा आहे.
दत्तात्रय लोहार यांनी खूप कष्टातून ही मिनी जिप्सी तयार केली आहे. यासाठी त्यांना अनेक प्रसंगाना सामोरे जावे लागले. परंतु, गाडी तयार करायचे ध्येय दत्तात्रय यांच्या समोर होते. त्यांनी हार न मानता ते पूर्ण केले. दत्तात्रय यांचा आदर्श आजच्या मुलांनी घ्यावा असे मत सरूताई धडे यांनी यावेळी व्यक्त केले.
मिनी जिप्सीवरील गीताचे बोल
गाडी पॉम पॉम, गाडी पॉम पॉम,
कशी वाजते मोटार, या गाडीला दत्ताभाऊ डायवर,
या गाडीला लोहार डायवर
गाडी पॉम पॉम,कशी वाजते मोटार,
या गाडीला वहिनी डायवर,
या गाडीला दत्ता भाऊ डायवर,
बाई कडेगाव तालुक्यात हाय देवराष्ट्रे गाव ,यशवंतराव चव्हाणांचे बाई हे देवराष्ट्रे गाव
गाडी पॉम पॉम, कशी वाजते मोटर,
या गाडीला दत्ता भाऊ डायवर, बाई
हाताची हाय ही कला, हाताची हाय ही कला महाराष्ट्रात प्रसाद दिला,
गाडी पॉम पॉम, कशी वाजते मोटर,
या गाडीला दत्ताभाऊ डायवर.
Sangli Mini Gypsy : तीन मुलींच्या शिक्षणासाठी अपंग बापानं बनवली मिनी जिप्सी
महत्वाच्य बातम्या