सांगलीतील रॅन्चोची महाराष्ट्रभर चर्चा; दत्तात्रय लोहारांनी बनवली 'मिनी जिप्सी'
भंगाराचे साहित्य आणि स्वतःच्या दुचाकीतील पार्टचा वापर करुन देवराष्ट्रेच्या दत्तात्रय लोहार यांनी छोटीशी पण युनिक अशा चार चाकी गाडी बनवली आहे.
सांगली : कडेगाव तालुक्यातल्या देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार यांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर भंगाराचे साहित्य आणि स्वतःच्या दुचाकी साहित्याच्या पार्टचे जुगाड करत छोटीशी पण युनिक अशा चार चाकी गाडीची बांधणी केली आहे. शिवाय ही चारचाकी सध्या गावातील रस्त्यावर, हायवेवर देखील सुसाटपणे धावत आहे. त्यामुळे ही चारचाकी गाडी सध्या सांगली जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.
भंगाराचे साहित्य आणि स्वतःच्या दुचाकीतील पार्टचा वापर करुन देवराष्ट्रेच्या दत्तात्रय लोहार यांनी छोटीशी पण युनिक अशा चार चाकी गाडी बनवली आहे. एका हाताने अपंग आणि अशिक्षित असलेल्या लोहार यांनी ही मिनी जिप्सी मुलासाठी, कुटुंबासाठी बनवली. या गाडीचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि महाराष्ट्र या मिनी जिप्सीची चर्चा सुरु झाली. ही गाडी स्टार्टरने नव्हे तर पायाने किक मारून चालू होते. पेट्रोलवर ही गाडी धावत असून 1 लिटर पेट्रोलमध्ये 40 ते 45 किलोमीटर इतके मायलेज असून ताशी 40 किलोमीटर वेगाने ही गाडी धावते. तर ही गाडी बनवण्यासाठी लोहार यांना 50 ते 60 हजार इतका खर्च आला आहे. या गाडीची मागची चाके ही स्कुटीची आहेत तर पुढची रिक्षाची आहेत. तीन-चार जण अगदी ऐटीत बसून जाण्यासारखी ही भन्नाट गाडी रस्त्यावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
दत्तात्रय यांच्या या गाडीची चर्चा पंचक्रोशीत नव्हे तर थेट आनंद महिंद्रांपर्यंत पोहोचली आहे. महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांना देखील कौतुक केली आहे. टाकाऊ वस्तूंपासून अशी भन्नाट निर्मिती करणाऱ्यांची आपल्या देशात कमी नाही. यापूर्वीही असे अनेक प्रयोग यशस्वी झाले आहेत.
दत्तात्रय यांची ही मिनी जिप्सी बनण्यामागे त्याच्या पत्नीची देखील मोठी मदत आहे. दत्तात्रय याची मुलगी आणि मुलगा देखील ही गाडी बिनधास्तपणे चालवतात. दत्तात्रय लोहार यांच्या फॅब्रिकेशनच्या माध्यमातून अनेक वस्तू बनवल्या आहेत. नेहमी ते नावीन्यपूर्ण गोष्ट बनवतात. चार चाकी आणि मिनी जिप्सी मात्र त्याची सध्या हिट झाली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या :
- Income Tax raids : चीनची मोबाईल कंपनी ओप्पोच्या डझनभर कार्यालयांवर आयकरचे छापे
- ITR: तुम्ही स्वत: भरा आयकर रिटर्न'; जाणून घ्या सोपी पद्धत
- Income Tax Saving Tips: तुमचं 5 लाखांहून अधिक उत्पन्न आहे? 'या' सोप्या टीप्स वाचवतील तुमचा 12 हजारांहून अधिक कर