Maharashtra Corona Update : राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या दहा हजारांखाली, 25 हजार 175 जणांची कोरोनावर मात
Maharashtra Corona Update : मागील 24 तासांत राज्यात 9 हजार 666 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 25 हजार 175 जणांची कोरोनावर मात केली आहे. याच कालावधीदरम्यान 66 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Maharashtra Corona Update : महाराष्ट्रातील दैनंदिन रुग्णसंख्यामध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत आहे. आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या महितीनुसार, मागील 24 तासांत राज्यात 9 हजार 666 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 25 हजार 175 जणांची कोरोनावर मात केली आहे. याच कालावधीदरम्यान 66 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यात आज 66 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद -
राज्यात आज 66 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.83 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 75 लाख 38 हजार 611 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.60 टक्के आहे. सध्या राज्यात 7 लाख 24 हजार 722 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2394 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 55 लाख 54 हजार 798 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत, त्यापैकी 78,03,700 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
तिसऱ्या दिवसी ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही -
सलग तीन दिवसांपासून राज्यात ओमायक्रॅानचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. आतापर्यंत 3334 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 2023 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत.
देशातील कोरोनास्थिती -
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 12 लाख 25 हजार 11 इतकी झाली आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या साथीमुळे प्राण गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 1 हजार 979 झाली आहे. आकडेवारीनुसार, काल दोन लाख 13 हजार 246 लोक बरे झाले, त्यानंतर 4 कोटी 4 लाख 61 हजार 148 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
शब्द हिरमुसले, सूर थांबले, लता मंगेशकर अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Lata Mangeshkwar Passes Away : लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा, सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
Lata Mangeshkar : लतादीदी यांनी व्यक्त केली होती 'ही' खंत, म्हणाल्या...
Lata Mangeshkar : 20 भाषांमध्ये तब्बल 30 हजारांहून अधिक गाणी, लता मंगेशकरांचा सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम!