Maharashtra News LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग मराठा आंदोलकांनी रोखला टायर जाळून सरकारचा निषेध
रवींद्र चव्हाण आणि आमदार वैभव नाईक यांची गुप्त भेट
सिंधुदुर्ग : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार वैभव नाईक यांची गुप्त भेट. सिंधुदुर्गात मोठी खळबळ. उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक यांनी आज सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची कणकवली शासकीय विश्राम गृहावर एका खोलीत अचानक गुपचूप भेट घेतली. या भेटीच्या वृत्ताने सर्वांच्या भुवया उंचावल्या. वैभव नाईक हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या अधून मधून बातम्या येत असतात. मात्र आज अचानक वैभव नाईक यांनी भाजपच्या रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन सर्वानाच धक्का दिला. या भेटीचा तपशील समजला नसून वैभव नाईक यांनी भेट घेतल्याचे मान्य केले आहे.
























