एक्स्प्लोर
Maharashtra Rain Updates Live : राज्यात पावसाचा जोर कमी, जाणून घ्या पावसाचे अपडेट्स एका क्लिकवर...
Maharashtra Rain Updates Live : राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, मुंबईसह परिसरात चांगल्याच पावसानं हजेरी लावली आहे.
LIVE
Key Events

Background
Maharashtra Rain Updates Live : सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसानं हजेरी लावली आहे. मात्र, मुंबईसह परिसरात रात्रभर जोरदार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी सख...
11:21 AM (IST) • 23 Aug 2022
अर्जुनी मोरगावमध्ये पावसामुळं घर कोसळलं
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव शहरात सततच्या पावसानं एक घर अचानक कोसळल्याची घटना घडली. हे घर कोसळण्याचा व्हिडिओ स्थानिक नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या जिल्हाभरात सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. विशेषबाब म्हणजे या रिकाम्या घरात कुणीही रहात नसल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
10:07 AM (IST) • 23 Aug 2022
पुणे-मुंबई लोहमार्गावर पुन्हा एकदा दरड कोसळली
पुणे-मुंबई लोहमार्गावर पुन्हा एकदा दरड कोसळली आहे. यावेळी ही दरड रेल्वेच्या एका इंजिनवर पडली आहे. पण सुदैवाने या इंजिनला बोगी नव्हत्या. त्यामुळं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मंकीहील स्टेशनजवळ मध्यरात्री तीन वाजता ही घटना घडली. मिडल लाईनवरून हे इंजिन लोणावळ्यातून कर्जतच्या बाजूने निघालं होतं. त्याचवेळी अचानकपणे मोठ्या दरडी खाली कोसळल्या. या इंजिनवर येऊन पडल्या. आता दरड हटवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे. मिडल लाईनवर ही दरड पडल्याने, अप आणि डाऊन लाईनच्या वाहतुकीला कोणतीही बाधा पोहचलेली नाही. रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे.
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
