संपूर्ण ऑगस्ट पावसाविना, ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या केवळ 42 टक्के पाऊस
मोठ्या तुटीमुळे आणि पुढचे काही दिवस पावसाची शक्यता नसल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
![संपूर्ण ऑगस्ट पावसाविना, ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या केवळ 42 टक्के पाऊस Maharashtra Rain Update Rainfall in August was only 42 percent of average a deficit of minus 58 percent of average संपूर्ण ऑगस्ट पावसाविना, ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या केवळ 42 टक्के पाऊस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/25/7b9d5ea794446df85f093624e89bf617169294198291189_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : पावसाबद्दल (Maharashtra Rain) चिंता वाढवणारी बातमी आहे.. फक्त ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर राज्यात सरासरीच्या उणे 58 टक्के तूट निर्माण झाली आहे. कारण, ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या फक्त 42 टक्के पाऊस झाला आहे. सर्वात विदारक परिस्थिती मराठवाड्यात आहेत. कारण तिथं सरासरीच्या केवळ 28 टक्के पाऊस झाला आहे. त्याखालोखाल मध्य महाराष्ट्र आणि कोकणात केवळ 36 टक्के पाऊस पडला आहे. राज्यातील 15 जिल्ह्यात पावसाच्या सरासरीतली तूट मोठी आहे. या मोठ्या तुटीमुळे आणि पुढचे काही दिवस पावसाची शक्यता नसल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
राज्यातील 15 जिल्ह्यात पावसाच्या सरासरीतली मोठी तूट निर्माण झाली आहे. सरासरीच्या उणे 20 टक्क्यांहून अधिक तूट आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यानंतर, सगळ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. पुढील काही दिवस पावसाची शक्यता नाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्ह आहेत. 1 जूनपासून जालन्यात फक्त 54 टक्के पाऊस, सांगली जिल्ह्यात फक्त 56 टक्के पाऊस, अमरावतीत सरासरीच्या फक्त 69 टक्के पाऊस
मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यात सरासरीच्या किती तूट ?
- औरंगाबाद : उणे 31टक्के तूट
- बीड : उणे 30 टक्के तूट
- हिंगोली : उणे 32 टक्के तूट
- जालना : उणे 46 टक्के तूट
- धाराशिव : उणे 2टक्के तूट
- परभणी : उणे 22 टक्के तूट
विदर्भातील कोणत्या जिल्ह्यात सरासरीच्या किती तूट?
उत्तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सरासरीच्या किती तूट ?
- धुळे : उणे 21 टक्के तूट
- नंदुरबार : उणे 20 टक्के तूट
पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सरासरीच्या किती तूट?
- अहमदनगर : उणे 32 टक्के तूट
- सांगली : उणे 44 टक्के तूट
- सातारा : उणे 36 टक्के तूट
- सोलापूर : उणे 25 टक्के तूट
8 ते 21 सप्टेंबरपर्यंत राज्यात चांगल्या पावसाची शक्यता
ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यानंतर, सगळ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. त्यातच हवामान विभागाने महत्त्वाचा अंदाज व्यक्त केलाय. ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडणार आहे. 8 ते 21 सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्रात सरासरीइतका किंवा त्याहून जास्त पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात येणारा पाऊस हा शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरू शकेल असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हे ही वाचा:
पावसाची दडी! पिकं वाचवण्यासाठी तांब्याने पाणी घालण्याची वेळ, थेंब-थेंब पाणी टाकून शेती जगवण्याची बळीराजाची धडपड
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)