एक्स्प्लोर

Parbhani Rain : परभणीत 15 वर्षानंतर सर्वाधिक पावसाची नोंद, ओढ्याच्या पुरात अडकलेल्या 12 जणांना वाचवलं

Parbhani Rain : परभणी शहर आणि परिसरात तब्बल 232 मिमी पावसाची नोंद झाली आहे. परभणीच्या मिरखेल येथे ओढ्यात अडकलेल्या 12 जणांसह दहा शेळ्यांना सुखरूप बोटीने बाहेर काढले.

परभणी : Maharashtra Rain Update : हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सर्वदूर पावसाने हजेरी लावल्यानं पेरणी झाल्यानंतर आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मराठवाड्यात देखील जोरदार पाऊस झाला. यात परभणी शहर आणि परिसरात तब्बल 232 मिमी पावसाची नोंद झाली आहे.  2005 आणि 2006 नंतर 15 वर्षानंतर एवढा पाऊस पडला असल्याचं सांगण्यात आलंय.

या पावसामुळे अनेक नदी नाले,ओढ्यांना पूर आला आहे. काल रात्री परभणीच्या पिंगळी पासुन पुढे मिरखेल येथे ओढ्यात सात पुरुष, पाच महिला अशा 12 जणांसह दहा शेळ्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या होत्या. ही बाब प्रशासनाला कळताच उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर, नवा मोंढा पोलीस ठाण्याचे अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी पवन खांडके, मंडळ अधिकारी पक्वाने, अग्निशमन दलाचे अधिकारी व स्थानिक गावकऱ्यांनी संयुक्त मदतकार्य राबवत बोटीच्या सहाय्याने या 12 जणांसह 10 शेळ्यांना सुखरूपपणे बोटीने बाहेर काढले. हे रेस्क्यू ऑपरेशन रात्री आठ ते पहाटे दीड वाजेपर्यंत चालले.

Maharashtra Rain Update : वरुणराजा बरसला, शेतकरी सुखावला... राज्यातील बहुतांश भागात पावसाची हजेरी

परभणी शहर आणि परिसरात 15 वर्षानंतर सर्वाधिक पावसाची नोंद

परभणी शहर आणि परिसरात तब्बल 232 मिमी पावसाची नोंद झाली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान शास्त्र विभागात या पावसाची नोंद कऱण्यात आली आहे. 2005 आणि 2006 नंतर 15 वर्षानंतर एवढा पाऊस पडला असल्याचं सांगण्यात आलंय. 24 तासात 232 मिमी पाऊस पडण्याची आजपर्यंतची तिसरी वेळ आहे. 2005 साली 242 मिमी,2006 साली 234 मिमी तर 2021 साली म्हणजे यंदा 232 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. कालच्या पावसाने जिल्ह्यातील अनेक रस्ते अजुनही बंदच आहेत.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुढील दोन दिवस सर्वत्र चांगल्या पावसाचा अंदाज, विभागवार अंदाज जाणून घ्या...

मराठवाड्यात सर्वत्र पावसाची हजेरी
मागच्या 24 तासात मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय.परभणी,नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय, उस्मानाबादमध्ये ही जोरदार पाऊस झालाय तर बीड,लातूर,औरंगाबादमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय. ज्यामुळे अनेक पिकांना मात्र जीवदान मिळाले असले तरी नांदेड आणि परभणी शहराची अवस्था मात्र फार वाईट झाली होती. सतत पडत असलेल्या पावसाने अनेक ठिकाणी रस्त्यावर आणि सखल भागात पाणीच पाणी झाले होते.परभणीत भीम नगर,क्रांती नगर,इंदिरा गांधी नगर,रामकृष्ण नगर मधील काही घरात पाणी शिरले तर रेल्वेस्थानक, बस स्थानक पूर्ण पाण्यात गेले होते.नांदेडमध्येही हीच परिस्थिती पाहायला मिळालीय.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devyani Pharande : 'दारू अन् जुगाराचे अड्डे चालवणाऱ्यांनी माझ्यावर काय आरोप करावे', देवयानी फरांदेंचा वसंत गितेंवर जोरदार पलटवार
'दारू अन् जुगाराचे अड्डे चालवणाऱ्यांनी माझ्यावर काय आरोप करावे', देवयानी फरांदेंचा वसंत गितेंवर जोरदार पलटवार
Pune Accident: पोर्शे चालवणाऱ्या लाडोबाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा, राज ठाकरे म्हणाले पैसे दिल्याशिवाय....
पोर्शे चालवणाऱ्या लाडोबाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा, राज ठाकरे म्हणाले पैसे दिल्याशिवाय....
'आमदार देवयानी फरांदेंच्या दबावाखालीच मनपाची कारवाई'; कार्यालय जमीनदोस्त झाल्यानंतर वसंत गितेंचा गंभीर आरोप
'आमदार देवयानी फरांदेंच्या दबावाखालीच मनपाची कारवाई'; कार्यालय जमीनदोस्त झाल्यानंतर वसंत गितेंचा गंभीर आरोप
शरद पवार अजितदादांच्या आणखी एका बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार, माजी आमदारासह 16 नगरसेवक दादांची साथ सोडण्याच्या तयारीत
शरद पवार अजितदादांच्या आणखी एका बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार, माजी आमदारासह 16 नगरसेवक दादांची साथ सोडण्याच्या तयारीत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3:00 PM : 30 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सvasant gite Office Nashik : वसंत गीतेंचं कार्यालय महापालिकेनं हटवलंAdvocate Aniket Nikam on IPC : आधी राजद्रोह हा गुन्हा होता, आता तो कायदा नसणारIPC Act India : भारतीय न्याय संहितेत नेमकं काय ? कोणत्या कलमांचा  समावेश?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devyani Pharande : 'दारू अन् जुगाराचे अड्डे चालवणाऱ्यांनी माझ्यावर काय आरोप करावे', देवयानी फरांदेंचा वसंत गितेंवर जोरदार पलटवार
'दारू अन् जुगाराचे अड्डे चालवणाऱ्यांनी माझ्यावर काय आरोप करावे', देवयानी फरांदेंचा वसंत गितेंवर जोरदार पलटवार
Pune Accident: पोर्शे चालवणाऱ्या लाडोबाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा, राज ठाकरे म्हणाले पैसे दिल्याशिवाय....
पोर्शे चालवणाऱ्या लाडोबाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा, राज ठाकरे म्हणाले पैसे दिल्याशिवाय....
'आमदार देवयानी फरांदेंच्या दबावाखालीच मनपाची कारवाई'; कार्यालय जमीनदोस्त झाल्यानंतर वसंत गितेंचा गंभीर आरोप
'आमदार देवयानी फरांदेंच्या दबावाखालीच मनपाची कारवाई'; कार्यालय जमीनदोस्त झाल्यानंतर वसंत गितेंचा गंभीर आरोप
शरद पवार अजितदादांच्या आणखी एका बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार, माजी आमदारासह 16 नगरसेवक दादांची साथ सोडण्याच्या तयारीत
शरद पवार अजितदादांच्या आणखी एका बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार, माजी आमदारासह 16 नगरसेवक दादांची साथ सोडण्याच्या तयारीत
'भारतानं विश्वकप जिंकला, तसंच आम्ही विधानसभा जिंकणार'; राधाकृष्ण विखे पाटलांना विश्वास
'भारतानं विश्वकप जिंकला, तसंच आम्ही विधानसभा जिंकणार'; राधाकृष्ण विखे पाटलांना विश्वास
Hardik Pandya: छपरी म्हणत भरमैदानात व्हिलन ठरवलं, त्याच हार्दिक पांड्याने एका ओव्हरमध्ये 24 धावा कुटणाऱ्या क्लासेनला टिपलं अन् सामना फिरला
क्लासेनने धुळधाण उडवली, भारतीयांनी आशा सोडल्या, पण 'छपरी' म्हणवल्या गेलेल्या हार्दिक पांड्याने गेम फिरवला
मोठी बातमी :  पंढरीच्या वारीत मी पायी चालणार नाही, शरद पवारांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
मोठी बातमी : पंढरीच्या वारीत मी पायी चालणार नाही, शरद पवारांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
Virat Kohli : किंग कोहलीवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव, इन्स्टाग्राम पोस्टवर लाईक्सचा पाऊस, काही तासात 1 कोटींचा टप्पा ओलंडला
भारतीय क्रिकेट चाहत्यांचा किंग कोहली निवृत्त, विराटच्या इन्स्टाग्राम पोस्टला काही तासात कोट्यवधी लाईक्स
Embed widget