एक्स्प्लोर

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुढील दोन दिवस सर्वत्र चांगल्या पावसाचा अंदाज, विभागवार अंदाज जाणून घ्या...

Maharashtra Weather Update : पुढील दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा सर्वत्र चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे तर विदर्भातील काही जिल्ह्यात पुढील दोन दिवस चांगला पावसाची शक्यता आहे.

Maharashtra Weather Update :   हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. विभागवार विचारकेला तर काही ठिकाणी अतिमुसळधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख आणि उपमहासंचालक डॉ. जयंत सरकार यांनी सांगितला आहे. पुढील दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा सर्वत्र चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे तर विदर्भातील काही जिल्ह्यात पुढील दोन दिवस चांगला पावसाची शक्यता आहे. 1 जूनपासून तेआजपर्यंत महाराष्ट्रात सरासरी पाऊस बघायला मिळाला आहे. ज्यात मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. 

कोकणात पुढील 5 दिवस काय परिस्थिती असणार?

कोकणात पुढील पाचही दिवस चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. कोकणात पुढील दोन दिवसाकरिता रेड अलर्ट देण्यात आला आहे. ज्यात प्रामुख्याने दक्षिण कोकणात म्हणजेच रत्नागिरी आणिसिंधुदुर्गात अतिमुसळधारेचा इशारा आहे. साधारणत: सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील काही भागात 210 मिमीपर्यंत पाऊस बघायला मिळू शकतो. तर पुढील 3 दिवस 70 ते 120 मामीपर्यंतपावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. 

मुंबईत काय पुढील 5 दिवस काय परिस्थिती? 

मुंबई पुढील पाचही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. आज मुंबईसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. ज्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे. तर पुढील चार दिवस आॅरेंज अलर्ट असेल. ज्यात 70 मिमी ते 120 मिमीपर्यंत पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला गेला आहे. मुंबईतील पावसामुळे काही ठिकाणी वाहतूक धीम्या गतीने बघायला मिळू शकते त्याचसोबत सखल भागात पाणी साचल्याचं देखील बघायला मिळू शकते. 

मध्य महाराष्ट्रात पुढील 5 दिवस काय परिस्थिती? 

मध्य महाराष्ट्र म्हणजेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे आणि नंदूरबारमध्ये देखील पुढील पाचही दिवस चांगला पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर घाट परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

मराठवाड्यात पावसाची काय परिस्थिती? 
मराठवाड्यात पुढील 5 दिवस सर्वच ठिकाणी पाऊस अपेक्षित, आहे. ज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामानविभागाकडून वर्तवला जात आहे. ज्यात 70 मिमी ते 120 मिमीपर्यंत पाऊस बरसण्याचा अंदाज आहे तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. ज्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. 1 जूनपासून ते आतापर्यंत मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. 

विदर्भात पावसाची काय स्थिती? 
विदर्भात मागील 2-3 दिवस चांगला पाऊस बघायला मिळाला. त्यात नागपुरात 100मिमीहून अधिक पाऊस झाला. प्रामुख्याने पूर्व विदर्भात चांगला पाऊस बघायला मिळाला होता. पुढील चार दिवस पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राकडून व्यक्त करण्यात आला आहे. ज्यात अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यात पुढील चार दिवस सर्वत्र पाऊस होऊ शकतो. तर अमरावती जिल्ह्यात काही भागात चांगला पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात देखील सर्वत्र पाऊस बघायला मिळू शकतो. तर भंडारा, गोंदियात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात

व्हिडीओ

Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
Embed widget