पुणे, सातारा, सांगली, पंढरपुरात पावसाची विश्रांती; पुढील 4 दिवसांत राज्यातील 'या' भागांत मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Rain Update : राज्याच्या विविध भागात पुढील 4 दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

Maharashtra Rain Update : पुढील 4 ते 5 दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, रायगड जिल्ह्यात पुढच्या 2 ते 3 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याचीही शक्यता आहे. नागरिकांनी घरातच थांबावं, असं आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
राज्याच्या विविध भागात पुढील 4 दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. केरळ, तमिळनाडू किनारपट्टीपासून लक्षद्वीप बेटापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे 8 ऑक्टोबरपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात मेघगर्जनेसह तर विदर्भातही पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवण्यात आला आहे.
काल (सोमवार) पुण्यात मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. नाना पेठ भागात जोरदार पावसामुळं पाणीच पाणी झालं होतं. पुणे रेल्वे स्टेशन बाहेरही पाणी साचलं होतं. अनेक ठिकाणी रस्त्यावर वाहतूक कोंडीही झाली होती. तिकडे सातारा जिल्ह्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसात शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झालं आहे. वाई, पाचगणी, कराड, लोणंद, कोरेगाव परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे.
सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या करुळ घाटात दरड कोसळली
तिकडे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या करुळ घाटात पावसामुळं दरड कोसळली आहे. दरड कोसळल्यामुळं या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. वैभववाडी तालुक्यात सायंकाळी झालेल्या पावसाचा फटका करुळ घाटाला बसला आहे.
पुण्याला पावसानं झोडपलं
पुणे शहरात काल संध्याकाळी मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळं शहरातल्या अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. नाना पेठ भागात जोरदार पावसामुळं पाणीच पाणी झालं होतं. पुणे रेल्वे स्टेशन बाहेरही पाणी साचलेलं पाहायला मिळालं.
सातारा जिल्ह्यातील अनेक भागांत काल विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. वाई, पाचगणी, कराड, लोणंद, कोरेगाव या परिसरातील मुसळधार पाऊस झालाय.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
