एक्स्प्लोर

Maharashtra Rain : मुंबईसह परिसरात पावसाची हजेरी, आज विदर्भात यलो अलर्ट

Maharashtra Rain : मुंबई, ठाण्यासह राज्यभरात सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. अन्य ठिकाणी मात्र पावसानं उघडीप दिली आहे.

Maharashtra Rain News : गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यात पावसानं (Rain) उघडीप दिली आहे. काही ठिकाणी मात्र, हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मुंबईसह (Mumbai) ठाणे (Thane) परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तसेच कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली. अन्य ठिकाणी मात्र, पावसानं उघडीप दिली आहे. दरम्यान, आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं तिथे पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अतिवृष्टीचा मोठा फटका विदर्भ आणि मराठवाड्याला बसला आहे. अशातच आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आत्तापर्यंत राज्यात पावसाचे प्रमाण समाधनाकारक राहिले आहे. जूनपासून आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. नदी आणि धरणांच्या पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. मात्र, जुलै आणि ऑगस्टमध्ये राज्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली होती. दरम्यान, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात मुसळधार पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्यानं वाहतुकीवरही परिणाम झाला होता. तसेच शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे.   

कोल्हापूर पाऊस

कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या रिपरिपमुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळी 21 फुट 10 इंचांवर पोहोचल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. पंचगंगेची इशारा पातळी 39 फुट, तर धोका पातळी 43 फुट आहे. पावसाच्या रिपरिपमुळे जिल्ह्यातील अजूनही 13 बंधारे पाण्याखाली आहेत. दुसरीकडे, पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या पावसाने राधानगरी धरणाचा सहाव्या क्रमांकाचा उघडला गेला आहे. धरणातून सध्या 3 हजार 28 क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे. कोल्हापूर शहर परिसरात पावसाने उघडीप दिली असली, तरी राधानगरी, गगनबावडा तसेच भुदरगड तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे. 

अतिवृष्टीचा मोठा फटका

राज्यात अतिवृष्टीचा खूप मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीनं राज्यातील 81 लाख 2 हजार हेक्टर जमीन बाधीत झाली आहे. यामध्ये जिरायती क्षेत्र 17 लाख 59 हजार 633 हेक्टर असून, बागायती क्षेत्र 25 हजार 476 हेक्टर आहे. फळ पिकांमध्ये 36 हजार 294 हेक्टर एवढे क्षेत्र बाधित झाले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अतिवृष्टी आणि पूर यामुळं आत्तापर्यंत सुमारे 138 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपये तातडीची मदत केली आहे. 21 हजार व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vasant More meet Prakash Ambedkar :   वसंत मोरे-प्रकाश आंबडेकर यांच्या भेटीत काय घडलं? दोघांनी मिळून सविस्तर सांगितलं!
Vasant More meet Prakash Ambedkar : वसंत मोरे-प्रकाश आंबडेकर यांच्या भेटीत काय घडलं? दोघांनी मिळून सविस्तर सांगितलं!
Deepak Kesarkar Meet Devendra Fadnavis : नारायणे राणे भेटल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये दीपक केसरकर फडणवीसांच्या भेटीला; रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा सुटणार?
राणे भेटताच काही तासांमध्येच केसरकर फडणवीसांच्या भेटीला; रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा सुटणार?
MP Srinivas Patil Withdraws Candidacy: मोठी बातमी : खासदार श्रीनिवास पाटील यांची सातारा लोकसभेतून माघार
मोठी बातमी : खासदार श्रीनिवास पाटील यांची सातारा लोकसभेतून माघार
Video : संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा; घोषणाबाजी, हाणामारीमुळे तणावाची स्थिती!
Video : संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा; घोषणाबाजी, हाणामारीमुळे तणावाची स्थिती!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maratha Baithak Rada Chhatrapati Sambhaji Nagar : मराठा समन्वयकांच्या बैठकीत तुफान राडाChanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचे दिवसभरातील सुपरफास्ट अपडेट्स : 29 मार्च  2024 :ABP MajhaShriniwas Patil Loksabha : श्रीनिवास पाटलांची लोकसभा निवडणुकीतून माघार!Pune : पुण्यात पुन्हा एकदा कोयत्याची दहशत, जुन्या वादातून हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasant More meet Prakash Ambedkar :   वसंत मोरे-प्रकाश आंबडेकर यांच्या भेटीत काय घडलं? दोघांनी मिळून सविस्तर सांगितलं!
Vasant More meet Prakash Ambedkar : वसंत मोरे-प्रकाश आंबडेकर यांच्या भेटीत काय घडलं? दोघांनी मिळून सविस्तर सांगितलं!
Deepak Kesarkar Meet Devendra Fadnavis : नारायणे राणे भेटल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये दीपक केसरकर फडणवीसांच्या भेटीला; रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा सुटणार?
राणे भेटताच काही तासांमध्येच केसरकर फडणवीसांच्या भेटीला; रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा सुटणार?
MP Srinivas Patil Withdraws Candidacy: मोठी बातमी : खासदार श्रीनिवास पाटील यांची सातारा लोकसभेतून माघार
मोठी बातमी : खासदार श्रीनिवास पाटील यांची सातारा लोकसभेतून माघार
Video : संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा; घोषणाबाजी, हाणामारीमुळे तणावाची स्थिती!
Video : संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा; घोषणाबाजी, हाणामारीमुळे तणावाची स्थिती!
Bacchu Kadu Vs Navneet Rana : मोठी बातमी : ... तर महायुतीतून बाहेर पडेन, बच्चू कडू यांचा पहिला रोखठोक इशारा
मोठी बातमी : ... तर महायुतीतून बाहेर पडेन, बच्चू कडू यांचा पहिला रोखठोक इशारा
Rohit Sharma : रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यासोबत फोटोत दिसणारी व्हायरल मिस्ट्री गर्ल कोण? इंस्टाग्राम पोस्टमधून उलगडा
रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यासोबत फोटोत दिसणारी मिस्ट्री गर्ल कोण? जाणून घ्या
Thalassemia : देवेंद्र फडणवीसांच्या संवेदनशीलतेमुळे 'ठाकरे' चा आजार बरा! प्रेरणादायक प्रवासाबाबत फडणवीस म्हणतात...
Thalassemia : देवेंद्र फडणवीसांच्या संवेदनशीलतेमुळे 'ठाकरे' चा आजार बरा! प्रेरणादायक प्रवासाबाबत फडणवीस म्हणतात...
कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल किर्तीकरांना दुसरं समन्स; 8 एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश
कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल किर्तीकरांना दुसरं समन्स; 8 एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश
Embed widget