एक्स्प्लोर

मुंबईकरांनो सावधान! आज अतिमुसळधार पावसाचा इशारा, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी, हवामान विभागाचा अंदाज काय? 

राज्यातील अनेक भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईसह परिसरात देखील आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Maharashtra Rain News: हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्चवण्यात आली आहे. राज्यातील अनेक भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईसह परिसरात देखील आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जाणून घेऊयात राज्यातील आजची हवामानाची स्थिती.

पुढील 24 ते 26 तासांपर्यंत सतत पाऊस पडणार

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 48 तासांत मुंबईसह परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ज्यामुळं अनेक भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. कारण पाऊस किमान पुढील 24 ते 26 तासांपर्यंत सतत मध्यम ते मुसळधार असण्याची शक्यता आहे.  दादर, वरळी, वांद्रे या पश्चिम उपनगरांमध्ये सर्वाधिक पाऊस पडेल असा अंदाज आहे. पश्चिमेकडील वारे कोकण किनारपट्टीवर योग्य आर्द्रतेसह संरेखित झाल्यामुळे मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

'या' जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील मुंबईसह ठाणे जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर कोकणातील रायगड आमि रत्नागिरी या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

'या'  भागात पावसाचा यलो अलर्ट 

आज राज्यातील विविध भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये नाशिकसह पालघर जिल्ह्याचा समावेश आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पहाटेपासूनच मध्यम ते मुसळधार पाऊस

दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पहाटेपासूनच मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळतोय. या पावासामुळं मुंबईतील काही सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळं वाहतुकीवर परिणाम होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, मंगळवारनंतर मुंबईतील पाऊस कमी झाला होता. मात्र, आजपासून पुन्हा मुंबईत पावासानं जोर पकडला आहे. दरम्यान, आज मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 

महत्वाच्या बातम्या:

परभणीकरांसाठी आनंदाची बातमी! येलदरी आणि निम्न दुधनाच्या धरणसाठ्यात वाढ 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget