हवामानाच्या स्थितीचा दुर्मिळ योग! राज्यात एवढा पाऊस पडण्याचं कारण काय? नेमकं काय म्हणाले हवामान अभ्यासक?
राज्यात पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईसह कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. याबाबतची माहिती हवामान अभ्यासकांनी दिलीय.

Maharashtra Rain News : राज्यात पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईसह कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पण सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) एवढा पाऊस पडण्याचं नेमकं कारण काय आहे? याबाबतची सविस्तर माहिती हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे (Mayuresh Prabhune) आणि उदय देवळाणकर (Uday Deolankar) यांनी एबीपी माझाला दिली आहे.
मान्सून ट्रफची स्थिती
राजस्थान, पंजाब ते बंगालचा उपसागरात मान्सून ट्रफची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळं बंगालच्या उपसागराच्या बाजूला कमी दाबाची क्षेत्र तयार झालं आहे. मान्सून ट्रफ त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिण बाजूला आहे. त्यामुळं महाराष्ट्रात दोन कमी दाबाची क्षेत्र तयार झाली आहेत. तसेच दक्षिण गुजरातला चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. एकाच वेळी ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडत असल्याची माहिती हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी दिली आहे. मान्सून ट्रफ त्यांच्या सर्वसाधारण स्थितीच्या उत्तर बाजूला असेल तर उत्तर भारतात जास्त पाऊस होतो. पण सध्या मान्सून ट्रफ सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिण बाजूला असल्यानं जोरदार पाऊस पडत आहे.

कमी दाबाची क्षेत्र ही उडीसा आणि पश्चिम बंगालमध्ये जास्त तयार झाली
कमी दाबाची क्षेत्र ही उडीसा आणि पश्चिम बंगालमध्ये जास्त तयार झाली आहेत. अरबी समद्रावरुन कमी दाबाच्या क्षेत्राकडे वारे खेचले जातात. त्यामुळं सह्याद्रीला वारे धडकतात, त्यामुळं किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार होतो त्याला ऑफ शोअर ट्रफ म्हणतात. यानंतर कोकण आणि घाटमाथ्यावर पाऊस पडतो. बंगालचा उपसागराच्या कमी दाबाचे क्षेत्र विदर्भात आले आहे, त्यानंतर लगेच दुसरं कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार झालं, त्याची तीव्रता वाढली. तेही जमिनीवर आलं आहे, त्यामुळं महाराष्ट्रात पावसाची अनुकूल स्तिथी असल्याची माहिती युरेश प्रभुणे यांनी दिली
22 तारखेपासून राज्यातील पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता
गुजरातजवळ अरबी समुद्रावर वातावरणात वरच्या बाजूला हवेची चक्रीय स्थिती आहे. यामुळं समुद्रातील बाष्प महाराष्ट्राच्या दिशेनं जमिनीवर ढकलले जात आहे, त्यामुळं रायगडपासून उत्तर भागात सातत्यानं उंच ढग तयार होतात म्हणून पाऊस जास्त पडत आहे. पश्चिम बंगालमध्ये दुसरं कमी दाबांचं क्षेत्र तयार झाल्यानं मराठवाडा आणि विदर्भात जास्त पाऊस पडत आहे. उंच ढगांमुळं मोठा पाऊस अपेक्षीत आहे.
22 तारखेपासून राज्यातील पावसाचा जोर कमी होईल अशी माहिती मयुरेश प्रभुणे यांनी दिली.
दुर्मीळ स्थिती तयार
मान्सून ट्रफ त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिण बाजूला आहे. त्यामुळं महाराष्ट्रात पाऊस दोन कमी दाबाची क्षेत्र तयार झाली. दक्षिण गुजरातला चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. एकाच वेळी ही स्थिती निर्माण झाली आहे. ही दुर्मिळ स्थिती असल्याचे मयुरेश प्रभुणे म्हणाले.
राजकोट ते बंगालपर्यंत द्रोणीय स्थिती
विशाखापट्टणम येथील समुद्रातून कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्रात आले आहे. पूर्व पश्चिम द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. राजकोट ते बंगालपर्यंत द्रोणीय स्थितीतयार झाली आहे, त्यामुळं महाराष्ट्रात जास्त पाऊस पडत असल्याची माहिती हवामान अभ्यासक उदय देवळाणकर यांनी दिली आहे. चार सप्टेंबरपर्यंत तयार होणाऱ्या द्रोणीस स्थितीमुळं ठरावीक पट्ट्यात बाष्प तयार होईल, त्यामुळं पाऊस पडणार असल्याचे उदय देवळाणकर म्हणाले.
बाष्पाची घनता वाढल्याने पावसाचं प्रमाण वाढलं
मध्य प्रदेशमध्ये हवेचा दाब जास्त होता. मराठवाड्यात आणि विदर्भात हवेचा दाब कमी झाला, त्यामुळं बाष्पाची घनता वाढल्याने पावसाचं प्रमाण वाढल्याची माहिती उदय देवळाणकर यांनी दिली. वाऱ्याची स्थिती, हवामानत झालेला बदल यामुळं पावसाची पद्धत बदलल्याचे देवळाणकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Rain News : मुंबईसह राज्यभरात पावसाचे धुमशान, मराठवाड्यात ढगफुटीसदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत; पुढचे 48 तास महत्त्वाचे
























