(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CM Eknath Shinde : पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
सध्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
CM Eknath Shinde on Maharashtra Rain : हवामान खात्यानं पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच सध्या देखील पावसाचा जोर वाढल्यानं काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीत जीवित आणि मालमत्तेची हानी होऊ नये, म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कोकणातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. तसेच NDRF च्या जवानांना तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. पाऊस, पुरपरिस्थिती हाताळण्यासाठी सचिवांना जिल्ह्यात जाण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
वाढता पाऊस आणि पुराची शक्यता पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा केली असून सबंधित पालक सचिवांना त्या त्या जिल्ह्यांमध्ये पोहचून प्रत्यक्ष देखरेख व नियंत्रण करण्याचे निर्देश दिले आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 5, 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाची परिस्थिती हाताळण्यासाठी सचिवांना जिल्ह्यात जाण्याचे दिले निर्देश दिले आहेत. मात्र, आता थेट जिल्ह्यात जाऊन देखरेख आणि नियंत्रण करण्याचे निर्देश दिल्यानंतर अनेक पालक सचिवांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पूर परिस्थितीचा आढावा घेतला. विशेषत: रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नागरिकांना पावसामुळं वाढत्या पाण्याची आणि पूर परिस्थितीचा वेळीच सूचना द्यावी. तसेच पूरग्रस्त भागातून स्थलांतर करावं लागल्यास योग्य ठिकाणी त्यांची व्यवस्था करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुंबईतील परिस्थितीवर देखील मुख्यमंत्री बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. जिल्ह्यातील जोरदार पावसामुळं काही नद्यांनी इशारा पातळी गाठली असून खबरदारी घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडे कमी आहे.
दरम्यान, जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरुन वाहत आहे. त्यामुळं या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणं, प्रसंगी त्यांना हलविणं तसेच जीवितहानी होऊ देऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. चिपळूण येथील परिस्थितीकडेही सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि नागरिकांना वारंवार सूचना देऊन त्यांना सावध ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या: