एक्स्प्लोर
पाऊस अपडेट : राज्यात कुठे-कुठे पावसाची हजेरी?
पुढच्या 24 तासात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.
मुंबई : मुंबईसह राज्यभरातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. येत्या 24 तासात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पाऊस अपडेट :
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणजवळील बहाद्दुर शेख पुलावरील वाहतूक पुन्हा सुरु, वशिष्ठी नदीची पाणी पातळी वाढल्याने वाहतूक बंद होती रत्नागिरी : शहर परिसरामध्ये पावसाचा जोर ओसरला, रात्रभर रत्नागिरीमध्ये विविध ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी नाशिक : संततधार पावसामुळे धरणांमधला विसर्ग वाढवला, गोदावरी, दारणासह उपनद्यांना पूर मुंबई : वसई, विरार आणि मिरा-भाईंदर शहरांमध्ये सकाळपासून संततधार पालघर : धामणी धरण 100 टक्के भरल्याने पाचही दरवाजे उघडले, सूर्या नदीद्वारे 18 हजार 700 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु, सूर्या आणि वैतरणाला मोठा पूर पंढरपूर : उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले जाणार, प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा रायगड : अनेक भागात पावसाची दमदार हजेरी, खोपोली, महाड, पेण, उरण, अलिबाग, रोहा परिसरात रात्रभर संततधार, जिल्ह्यातील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ पुणे : इंदापूर आणि परिसरात रात्रीपासून रिमझिम सुरुच मुंबईत ‘कोसळधार’ मुंबईसह उपनगरात रात्रीपासून जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, बांद्रा, दादर भागात सर्वत्र पावसाची बॅटिंग सुरु आहे. पालघरमधील ‘धामणी’ फुल्ल, ‘सूर्या’ला पूर पालघरमध्येही गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे धामणी धरण फुल्ल झालं आहे. धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे धरणातून जवळपास 14 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत करण्यात येतो आहे. यामुळे सूर्या नदीला पूर आला आहे. नाशिकमध्ये रामकुंडासह गोदाकाठही पाण्याखाली! नाशिकच्या गोदावरीला पुन्हा पूर आला आहे. रामकुंडांसह गोदाकाठ पाण्याखाली गेला असून प्रशासनानं हाय अलर्ट जारी केला आहे. सातत्यानं सुरु असलेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात आला असून त्यामुळं गोदावरी, दारणा, वालदेवी, नासर्डी आदी नद्यांनाही पुर आला आहे. ‘कपिलधार’ जलमय! मराठवाड्यात झालेल्या पावसानंतर नद्यांना तुडुंब वाहू लागल्या आहेत. बिंदुसरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. तर कपिलधार धबधबाही ओसंडून वाहू लागला आहे. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच धबधब्याला एवढं पाणी आलं आहे. श्रावण महिना कोरडा गेल्यानंतर गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने धबधबा वाहू लागला आहे. सत्तर मिमी पावसाने बालाघाट डोंगर रांग हिरवाईनं नटली आहे. रत्नागिरीतली वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणजवळील बहाद्दूर शेख पुलावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने ही वाहतूक थांबवण्यात आली आहे. येत्या 24 तासात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा पुढच्या 24 तासात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टी, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement