एक्स्प्लोर

Maharashtra Rain LIVE Update : मराठवाडा, विदर्भासह राज्यभरातील पावसाचे अपडेट्स एका क्लिकवर...

Maharashtra Rain LIVE Update : मराठवाडा आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची कोसळधार पाहायला मिळत आहे. राज्यभरातील पावसाचे अपडेट्स एका क्लिकवर...

LIVE

Key Events
Maharashtra Rain LIVE Update : मराठवाडा, विदर्भासह राज्यभरातील पावसाचे अपडेट्स एका क्लिकवर...

Background

Maharashtra Rain LIVE Update : उस्मानाबाद, बीड, लातूर जिल्ह्यांत पावसाचं रौद्ररूप पहायला मिळत असून सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे. मुसळधार पावसामुळं अनेक नद्यांना पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अशातच अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. इतर ठिकाणीही अनेकांच्या घरात पाणी घुसलं आहे. नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याच्या प्रशासनानं सूचना दिल्या असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. 

महाराष्ट्रामध्ये सोयाबीन पिकानं लागवडीच्या क्षेत्रात गेल्या दशकभरापासून मोठी आघाडी घेतली आहे. यावर्षीच्या लागवडीचा तर देशात मोठा विक्रम झाला आहे. मध्य प्रदेशला मागे टाकून सोयाबीनची महाराष्ट्रात देशात सर्वात जास्त लागवड झाली आहे. सध्या सतत पाऊस पडतो आहे. त्याचा सोयाबनीला सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक ठिकाणी सोयाबिनला कोंब फुटू लागले आहेत. मुसळधार बरसणाऱ्या पावसानं बळीराजाची चिंता वाढली आहे. 

हवामान विभागाकडून राज्यातील 7 जिल्ह्यांना रेड तर 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाकडून राज्यातील 7 जिल्ह्यांना रेड तर 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नागरिकांनाही खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. ज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी बघायला मिळणार आहे. सोबतच वाऱ्यांचा वेग देखील अधिक राहणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील चंद्रपूर, नांदेड, लातूर आणि उस्मानाबादेत अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यात आजसाठी चारही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे ह्या जिल्ह्यात काही ठिकाणी 200 मिमीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. ह्या पावसामुळे कापणीला आलेल्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील सोयाबीन आणि कापसाचं नुकसान होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना पुन्हा फटका बसू शकतो. 

बुलढाणा जिल्ह्यात काल रात्रीपासून सर्वत्र संततधार पाऊस सुरू असून आज सकाळी पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अतिवृष्टी  होत आहे. त्यामुळे सर्वच नदी ओढ्याना पूर आलेला आहे. शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवत जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. अनेक प्रकल्प पूर्ण भरले असून काही प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे.

12:56 PM (IST)  •  29 Sep 2021

बुलडाणा जिल्ह्यातील अनेक मार्ग दुसऱ्या दिवशीही ठप्प, जालना-खामगाव महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

जिल्ह्यात आज सकाळपासून पावासाने विश्रांती घेतली असली तरी मात्र खडकपूर्णा प्रकल्पातून 1 लाख 10 क्यूसेक्स चा विसर्ग सुरू असल्याने खामगाव - जालना महामार्गाच्या खडकपूर्णा नदीच्या पुलावरून 8 ते 10 फूट पाणी असल्याने हा महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी ही ठप्प आहे.या महामार्गावर  वाहनांच्या जवळपास 10 - 10 किमीच्या रांगा लागलेल्या असून जड वाहनचालकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे , देऊळगाव मही गावातून पूर्णपणे वाहतूक ठप्प आहे व मोठ्या वाहनांच्या रांगा बघायला मिळत आहे.

12:46 PM (IST)  •  29 Sep 2021

हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनचे 70 टक्के नुकसान, एकूण 2 लाख हेक्टर शेत जमिनीवरील सोयाबीनचे नुकसान  

मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनचे 70 टक्के नुकसान, एकूण 2 लाख हेक्टर शेत जमिनीवरील सोयाबीनचे नुकसान.   

12:03 PM (IST)  •  29 Sep 2021

वीजेच्या तारेला स्पर्श झाल्याने काका पुतण्याचा मृत्यू

Maharashtra Rain LIVE Update : वीजेच्या तारेला स्पर्श झाल्याने काका पुतण्याचा मृत्यू, यवतमाळमधील पुसद तालुक्यातील ईसापूर धरण परिसरातील घटना  

11:22 AM (IST)  •  29 Sep 2021

गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदी किनारी रामकुंड परिसरात होणाऱ्या दशक्रिया विधींना फटका

गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदी किनारी रामकुंड परिसरात होणाऱ्या दशक्रिया विधींना फटका बसलाय, पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने रस्त्यावर जिथे जागा मिळेल तिथे विधी उरकण्याची वेळ भाविकांवर आलीय.  त्यामुळे एकाच ठिकाणी प्रचंड गर्दी होत आहे, परिसरातील धर्मशाळा, सभागृह आशा सुरक्षित ठिकाणी विधी करण्याची गरज आहे 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget