Milk Price Protest LIVE | दूध दराबाबत दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्त्वात बैठकीला सुरुवात
Maharashtra Protest for Milk Prices | स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज दूध दर वाढीसाठी राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. गायी आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये वाढ मिळावी, केंद्र सरकारने दूध भुकटी आयात निर्णय बदलावा, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात या आंदोलनाची तीव्रता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी टँकरची फोडाफोडी करण्यात आली तर काही ठिकाणी देवाला अभिषेक घालून तर कुठे बैलांना दुधाची आंघोळ घालून आंदोलन सुरु झालं.
LIVE
Background
दूध दराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात या आंदोलनाची तीव्रता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी टँकरची फोडाफोडी करण्यात आली तर काही ठिकाणी देवाला अभिषेक घालून तर कुठे बैलांना दुधाची आंघोळ घालून आंदोलन सुरु झालं. सांगली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. जिल्ह्यात दोन ठिकाणी टँकर फोडून दूध रस्त्यावर सोडण्यात आलं. तर कोल्हापूरमध्येही आंदोलनाचे पडसाद पाहायला मिळाले. इथे भैरवनाथाला अभिषेक घालून आंदोलन सुरु झालं खरं, मात्र त्यानंतर कार्यकर्त्यांनी इथेही दूध घेऊन जाणाऱ्या टेम्पोमधील दुधाचे कंटेनर रस्त्यावर रिकामी केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज दूध दर वाढीसाठी राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. गायी आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये वाढ मिळावी, केंद्र सरकारने दूध भुकटी आयात निर्णय बदलावा, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे.
कुठे कुठे आंदोलनाला सुरुवात?
सांगलीत गोकुळचा टँकर फोडला
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दर आंदोलनाला सांगली जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सकाळपासून दोन ठिकाणी दुधाचा टँकर फोडण्यात आला. सुरुवातीला पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाळवा तालुक्यातील येलूर फाट्याजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पहाटेच्या सुमारास गोकुळ दूध संघाचा टँकर फोडला. गोकुळ दूध संघाचा टँकर 25 हजार लिटर दूध घेऊन मुंबईला जात होता. याशिवाय कसबे डिग्रजहून मुंबईकडे निघालेला राजारामबापू दूध संघाचा एक टँकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फोडला.
कोल्हापुरात आधी अभिषेक मग फोडाफोडी
कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नांदनी या ठिकाणी भैरवनाथला दुधाचा अभिषेक घालून दूध दर आंदोलनाला सुरुवात केली. कार्यकर्त्यांनी गावागावात अभिषेक घातला. त्यानंतर बिद्री या ठिकाणी गोकुळचा टँकर फोडला.
बुलढाण्यात बैलांना दुधाची आंघोळ
बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील निरोड इथे स्वाभिमानीच्या वतीने प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात बैलांना दुधाची आंघोळ घालून आंदोलन केले आहे. सरकारने दुधाला प्रति लिटर 10 रुपये अनुदान द्यावे, दूध पावडरला प्रति किलोला 50 रुपये अनुदान द्यावे आणि तूप, दूध पावडर तसंच बटरयावरील जीएसटी कमी करावा अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे. सरकारने राजु शेट्टी यांच्या दूध बंद आंदोलनाची दखल न घेतल्यास देशाला लागणारे अन्न धान्य बंद करावे लागेल, असा इशारा या आंदोलनातून सरकारला देण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
सांगलीत दूध दर आंदोलनाचा भडका, स्वाभिमानीने टँकर फोडून हजारो लीटर दूध रस्त्यावर सोडलं
दूध दरवाढीच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेसह विरोधी पक्ष रस्त्यावर, उद्या मंत्रालयात बैठक