महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पूरग्रस्तांसाठी 1 कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांकडे चेक सुपुर्द
राज्यातील पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी मंत्री पंकजा मुंडे आणि सिद्धेश कदम यांनी 1 कोटी रुपयांच्या देणगीचा धनादेश दिला आहे.
Maharashtra Pollution Control Board : अतिवृष्टी आणि पुरामुळं महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेकांची पिकं वाहूनगेली आहेत, तर काही शेतकऱ्यांच्या जमिनी देखील खरवडून गेल्या आहेत. अशा पूरग्रस्तांसाठी विविध स्तरातून मदतीचा ओघ येत आहे. अशातच राज्यातील पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी मंत्री पंकजा मुंडे आणि सिद्धेश कदम यांनी 1 कोटी रुपयांच्या देणगीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
राज्यभरात आलेल्या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झालं आहे
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटीचा आर्थिक निधीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम आणि पंकजाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 1 कोटी सुपूर्द करण्यात आले. राज्यभरात आलेल्या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झालं आहे. यामुळं शेतकरी बांधवांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. याकरिता राज्यभरातील अनेक संस्थांकडून मदतीचे ओघ सुरू असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक कोटीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी आज मंत्रालयात सुपूर्द केला.
राज्यावर आलेल्या या संकटाला आर्थिक मदतीचा हातभार
राज्यावर आलेल्या या संकटाला आर्थिक मदतीचा हातभार लावणं आणि त्याचबरोबर शेतकरी बांधवांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यायला हवे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी केल आहे. सिद्धेश कदम यांनी घेतलेला या निर्णयामुळे आता निमशासकीय अनेक महामंडळे पुढे येऊन मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करतील असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
मराठवाडा आणी पश्चिम महाराष्ट्रात मोठा महापूर आला आहे. यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकरी नाराज झालेले आहेत. अतिवृष्टीच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनाकंडून, संस्थांकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा ओघ येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली आहे. तर काही ठिकाणी पिकं वाहून गेली आहे, जमिनी देखील वाहून गेली आहेत.
महत्वाच्या बातम्या:
























