एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Uddhav Thackeray: भाजपवर हल्लाबोल...समान नागरी कायद्यावर भाष्य; उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

Uddhav Thackeray: शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना भाजपवर बोचऱ्या शब्दात टीका केली.

Shiv Sena Uddhav Thackeray Speech Highlights:  शिवसेना ठाकरे गटाचे आज वरळीमध्ये शिबीर पार पडले. या शिबिराला राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने या शिबिराचा समारोप झाला. आपल्या समारोपीय भाषणात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गट, भाजपवर सडकून टीका केली. गद्दारांचा फौजेचा नेतृत्व करण्यापेक्षा मूठभर निष्ठावंतचा नेतृत्व करू असे ठाकरे यांनी म्हटले. सरकार कसे चाललंय तर, 'उठ सूट लुटालूट' असं सरकार चाललं असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 
 
> उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे: 

- गद्दारांच्या फौजेचा नेतृत्व करण्यापेक्षा मूठभर निष्ठावंतचा नेतृत्व करू 

- मुंबईचं महत्व कमी करण्याचा काम सुरू आहे. मुंबई तोडण्याचा काम जो करतील त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे करू, असं बाळासाहेब म्हणाले होते.

- मी 23 जूनला पाटणाला चाललोय. आधी भाजपचे लोक मातोश्री वर येत होते आता सगळ्या पक्षाचे नेते येत आहेत. विरोधी पक्षाचे नेते एकत्र येतील का? पंतप्रधान उमेदवार कोण असेल? असे प्रश्न विचारले जातात. 

- आता ही एकजूट स्वातंत्रप्रेमीची होणार आहे. देशावर प्रेम असणाऱ्यांची एकजूट आहे. 

- फडणवीस यांची अवस्था म्हणजे 'सांगताही येत नाही अन् सहनही करता येत नाही' अशी झालीय...

- कर्नाटक सरकारने सावरकर यांचा धडा वगळला मला फडणवीस यांनी प्रश्न विचारला. सावरकर यांचा धडा गाळला याचा शिवसेना निषेध करते. जर तुम्ही देवेंद्रजी खरे सावरकर प्रेमी असाल तर देश बुडाखाली घेणाऱ्या नेत्यांचा धिक्कार करा!

- हिटलरने सत्ता आल्यानंतर लगेच छळछावणी सुरू केली नाही. त्याने छळ सुरू करत विरोधी पक्ष कमी केले. जनता जेव्हा शांत बघत होती तेव्हा हिटलर माजला. त्यानंतर दडपशाही सुरू केली. आपल्या देशाची स्थिती म्हणजे हिटलरशाहीकडे जातेय का? अशी स्थिती आहे. 

- अमित शाह मला 370 कलम रद्द केल्याबद्दल प्रश्न विचारता? तुम्हाला अदाणीचा प्रश्न विचारल्यावर बोबडी वळते. 370 कलम रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलींग...सहा वर्षानंतरही निवडणूक नाही.

- कर्नाटकमध्ये पंतप्रधान मोदींचा चेहरा कमी पडला मग बजरंगबली आणले मग पेटवली ना तुमची सत्तेची खुर्ची

- जर देश मजबूत हवा असेल तर सरकार स्थिर हवं 

- आता देशाचे तुकडे करतील का? अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

- यांचा गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा चालू आहे जी हुजूर जी हुजूर करतात

- मोहनजी तुम्ही आरएसएसचं हिंदुत्व काय आहे ते सांगा ? 

- समान नागरी कायदा आणा आमचा पाठिंबा आहे, पण या विषयावर लोकसत्तामध्ये आलेला अग्रलेख वाचा...हिंदूंना त्रास होणार का? हे आधी सांगा 

- राज्यकर्ते म्हणून समान कायदा आणा...आम्ही आरोप केले की ते झाकून ठेवायचे 

- बीएमसीची कुत्रा पकडण्याची गाडी असते...तसं भाजप करतंय...दुसऱ्या पक्षातील भ्रष्ट मानस दिसले की ते पकडतात 

- कमळाबाई हा भ्रष्ट जनता पार्टी झाला आहे

- मिंदे यांना भाजपने सांगितलं निवडणूक आधी काही हजार कोटी आणा यासाठी बीएमसीची लुटा लूट सुरू आहे

- भाजप आव्हान नाही, त्यांचा कारभार हे आव्हान आहे. लवकर सत्तेतून बाहेर काढू म्हणजे आपला देश स्वच्छ होईल 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Konkan Project Special Report : नाणार आणि बारसू प्रकल्पांचं काय होणार?Murlidhar Mohol Special Report : मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची का होतेय चर्चा?Maharashtra Election EVM Special Report : महाराष्ट्राचा निकाल, EVM वरून वाद, Baba Adhav यांचं आंदोलनSaudala Shirdi Special Report : शिव्या देणार त्याला 500 रुपये दंड बसणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
Embed widget