Maharashtra Politics Shiv Sena मुंबई महापालिकेतील कार्यालयावर ताब्याचा प्रयत्न, शिवसेना भवनाचे काय? भरत गोगावलेंनी स्पष्ट सांगितले
Maharashtra Politics Shiv Sena: मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्यानंतर शिंदे गट शिवसेना भवनही ताब्यात घेणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.
Maharashtra Politics Shiv Sena: शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) नेतृत्वात फूट पडल्यानंतर शिंदे (Shinde Faction) आणि ठाकरे गटातील (Shivsena Thackeray Faction) मतभेद वाढू लागले आहेत. पक्षाचे पदाधिकारी फोडल्यानंतर शिंदे गटाने आता शिवसेना शाखा, पक्ष कार्यालयाकडे आपले लक्ष वळवले आहे. बुधवारी मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे कार्यालय (Shivs Sena BMC Office) ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता शिवसेना भवनवरही शिंदे गट ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना भवन ताब्यात घेण्याबाबत शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मुंबईतील शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) ताब्यात घेण्याचा विचार नसल्याचे त्यांनी म्हटले. विधान भवनात माध्यमांसोबत (Maharashtra Winter Session 2022) बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही टीकास्त्र सोडले.
फ्रीजचे दरवाजे उघडण्याची वेळ आलीय
विधान भवनात माध्यमांसोबत बोलताना भरत गोगावले यांनी म्हटले की, दीपक केसरकर यांनी फ्रीजच्या खोक्याचा उल्लेख केला होता. विरोधकांकडे खोके-बोके करण्याशिवाय काहीच नाही. केसरकर यांनी उल्लेख केलेल्या फ्रीजच्या चाव्या सध्या आमच्याकडे आहेत. आता, हा 'फ्रीज' लवकर उघडा म्हणून दीपक केसरकरांना विनंती करणार असल्याचे गोगावले यांनी म्हटले. शिंदे गटातील खासदार-आमदारांनी मातोश्रीवर फ्रीजच्या खोक्यातून पैसे नेले जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर मातोश्रीवर किती खोके पोहचले हे उघड करणार असल्याची धमकी शिंदे गटाकडून देण्यात आली होती.
संजय राऊत हतबल, त्यांचे रक्तांतर राष्ट्रवादीसोबत झालंय
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला गोगावले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. रक्तांतर आमचे झाले नसून त्यांचेच राष्ट्रवादीसोबत झाले असल्याचे गोगावले यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना संजय राऊत हे आतील गोटातील बातम्या देत असल्याचा आरोप गोगावले यांनी केला. संजय राऊत यांच्याकडे काहीच मसाला काही नाही. त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या. ते हतबल झाले असून त्यांच्या आरोपांना आम्ही कामातून उत्तर देऊ असेही गोगावले यांनी म्हटले. आम्ही एका बापाचे होतो म्हणून आम्ही हिंमत केली. तुम्ही आमचा बाप काढू नका असा इशाराही त्यांनी दिला. भुंकणारा कुत्रा कधी चावत नाही. त्यामुळे त्यांना गांभीर्यानं घ्यायचं नसतं असा टोलाही आमदार भरत गोगावले यांनी लगावला.
इतर महत्त्वाच्या बातम्या: