Ajit Pawar: आठवडाभर कुठं होतो? मावळ दौऱ्यावर आलेल्या अजित पवारांनी स्पष्ट सांगितले
Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मागील काही दिवसांच्या अनुपस्थितीबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे पुन्हा एकदा सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले आहेत. मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमात दिसत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. आज, या चर्चांना अजित पवार यांनी पूर्णविराम दिला. आपण परदेशात होतो अशी माहिती त्यांनी दिली. अजित पवार आज मावळच्या दौऱ्यावर आहेत.
शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबीर पार पडले होते. शिबिराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे ब्रीच कॅण्डी रुग्णालयातून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन हजर राहिले होते. मात्र, अजित पवार हे अनुपस्थित असल्याने मोठी चर्चा सुरू झाली होती. अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा रंगू लागली होती. त्याच दरम्यान राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावरून राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मात्र, अजित पवार यांनी मौन बाळगल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते. अजित पवार यांनी सोशल मीडियावरही प्रतिक्रिया नोंदवली होती. मात्र, त्याच वेळी अजित पवार यांनी आर्थिकदृष्ट्या मागासघटकांना आरक्षण देण्याचा निर्णय वैध असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता. अजित पवार यांनी त्याचे स्वागत केले होते.
अजित पवार यांनी काय म्हटले?
जवळपास सात दिवसानंतर अजित पवार यांनी सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी पाच दिवस कुठे होतो, याचा उलगडा केला आहे. अजित पवार यांनी म्हटले की, खोकला सुरू झाला होता, त्यानंतर परदेशात गेलो होतो. आता तब्येत बरी आहे. पण काहीही बातम्या सुरू झाल्या होत्या, असे म्हणत त्यांनी चर्चांना पूर्ण विराम लावला. मावळ येथील कार्यक्रमात बोलताना त्यांनी जाहीरपणे चर्चांना पूर्णविराम लावला. अजित पवार यांनी म्हटले की, गेली चार-पाच वर्षे मी परदेशात गेलो नव्हतो. त्यामुळे 4 नोव्हेंबर रोजी मी परदेशात गेलो आणि काल मध्यरात्री मी पोहचलो. थकलो होतो, पण आज ही इथं आलो नसतो तर आणखी वेगळ्याच बातम्या लागल्या असत्या. दादा इथं आले, दादा इथं नाही आले, दादा गायब झाले, दादा नाराज झाले. काहीही बातम्या सुरू होत्या. वारेमाप चर्चा करायची. दादा वाचून ह्यांचं काय नडते काय कळत नाही. दादाला काही खाजगी आयुष्य आहे की नाही? उगाच काहीही उठवून बदनामी करायची. असं म्हणत गायब असणाऱ्या आणि नाराजी मागचं गूढ अखेर स्वतःच समोर आणलं.
अजित पवारांच्या अनुपस्थितीने चर्चा
अजित पवार यांच्या अनुपस्थितीबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. शिर्डी येथील शिबिरात अजित पवारांची अनुपस्थिती म्हणजे दादा नाराज तर नाहीत ना, गुवाहटीच्या रस्त्यावर लक्ष ठेवून राहा रे कुछ तो गडबड है, असं ट्वीट मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी केलं होतं तर दुसरीकडे शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी अजित पवार यांची गॅरंटी कोणीच घेऊ शकत नाही असं म्हटलं होते. गोऱ्हे यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
पाहा व्हिडिओ: शिर्डीच्या शिबिरानंतर अनेक दिवस कुठे होते अजित पवार? स्वतः दादांनी सांगितली कहाणी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
