Maharashtra Industries Project: वेदांता-फॉक्सकॉनबाबत मविआकडून दिरंगाई? RTI मधून नवीन माहिती समोर
Maharashtra Politics: महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात दिरंगाई झाल्याने वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. वेदांताने प्रस्ताव सादर केल्यानंतर सहा महिने हायपॉवर बैठक झाली नसल्याची माहिती एमआयडीसीने दिली.
![Maharashtra Industries Project: वेदांता-फॉक्सकॉनबाबत मविआकडून दिरंगाई? RTI मधून नवीन माहिती समोर maharashtra politics midc revel information under right to information act on vedanta foxconn project Maharashtra Industries Project: वेदांता-फॉक्सकॉनबाबत मविआकडून दिरंगाई? RTI मधून नवीन माहिती समोर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/02/a19b52974f478526f6335aeb7eff57ce1667382256312290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे-फडवणीस सरकारमध्ये वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta Foxconn Project) महाराष्ट्रातून गेल्यामुळे वाद सुरु असताना दुसरीकडे माहितीच्या अधिकारात (RTI) नवी माहिती समोर आली आहे. वेदांता कंपनीच्या गुंतवणुकीसाठी महाविकास आघाडी सरकारने वेळीच पाऊल न उचलल्याने फटका बसला असल्याची माहिती एमआयडीसीने (MIDC) माहिती अधिकारातंर्गत दिली आहे.
जानेवारी 2022 मध्ये वेदांता कंपनीने गुंतवणुकीबाबत एमआयडीसीला अर्ज दिला होता. मात्र, हायपॉवर कमिटीची बैठक सहा महिन्यानंतर झाली असल्याचे एमआयडीसीने म्हटले आहे. एमआयडीसीने दिलेल्या माहितीमुळे मविआ सरकारची दिरंगाईच वेदांता-फॉक्सकॉन राज्याबाहेर जाण्यासाठी कारणीभूत ठरली का, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, जानेवारी ते जुलै दरम्यान राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी सुरू होत्या. त्याच्या परिणामी गुंतवणुकीकडे दुर्लक्ष झाले का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
>आरटीआयमध्ये मिळालेली माहिती-
वेदांता प्रकल्प संदर्भात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून मिळालेली अधिकृत माहिती
1) वेदांता प्रकल्पाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळकडे कधी अर्ज केला?
- वेदांताने 5 जानेवारी 2022 व दिनांक पाच मे 2022 या दिवशी प्रकल्पाबाबत सदस्य अभिव्यक्ती (expression of interest) केली
- त्यानंतर वेदांताने 14 मे 2022 रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे गुंतवणुकी बाबत अर्ज सादर केली
2) वेदांतासाठी हाय पावर कमिटीची बैठक कधी झाली?
- 15 जुलै 2022 रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची (हाय पावर कमिटीची) बैठक घेण्यात आली
3) नवीन शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर काय पाठपुरावा करण्यात आला?
- 14 जुलै 2022 व 15 जुलै 2022 या तारखांना मुख्यमंत्री प्रमुख उपमुख्यमंत्री यांनी वेदांता कंपनीस पत्र लिहून महाराष्ट्र मध्ये गुंतवणुकीसाठी पाचरण केले
- 15 जुलै 2022 रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची बैठक घेण्यात आली
- 26 जुलै 2022 रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सोबत वेदांता आणि फॉक्सकॉन कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली त्यामध्ये वेदांताचे जागतिक व्यवस्थापकीय संचालक आकर्ष हेब्बर यांचा सामावेश होता
- 26 जुलै 2022 ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेदांता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांना पत्र लिहून सामंजस्य करण्यासाठी आमंत्रित केलं
- 27 व 28 जुलै 2022 रोजी बॉक्स कॉम कंपनीच्या प्रतिनिधींनी तळेगाव टप्पा क्रमांक चार येथे भेट दिली प्रस्तावित जमिनीची व उपलब्ध सुविधांची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये आंध्रा डॅम जलशुद्धीकरण केंद्र व पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांचा समावेश होता
- पाच ऑगस्ट 2022 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेदांता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांची मुंबईमध्ये भेट घेऊन प्रस्तावित प्रकल्पाला शासनाचा पूर्ण पाठिंबा व्यक्त केला
- 5 सप्टेंबर 2022 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी अनिल अग्रवाल यांना पत्र देऊन सामंजस्य करार करण्यासाठी आमंत्रित केलं
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)