एक्स्प्लोर

Maharashtra Politics Crisis : शिंदे गटाप्रमाणे भाजपमध्ये देखील मंत्रीपदावरून नाराजी; शिंदेसेनेच्या नेत्याचा मोठा दावा

Maharashtra Politics Crisis : विशेष म्हणजे, नाराजीबाबत आजपर्यंत भाजपच्या आमदारांकडून उघडपणे यावर भाष्य करण्यात आले नव्हते, मात्र शिंदे गटाच्या नेत्याने यावर भाष्य केले आहे.

Maharashtra Politics Crisis : अजित पवारांच्या (Ajit Pawar) भाजपसोबत (BJP) जाण्याच्या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणात क्षणाक्षणाला वेगवेगळ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. दरम्यान शिंदे गटात मंत्रीपदावरून दोन गट निर्माण झाल्याची चर्चा आहे. एवढेच नाही तर दोन आमदार मंत्रीपदावरून भिडल्याची देखील माहिती समोर येत आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना भाजपमध्ये देखील सर्व काही आलबेल नसल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाठ (Sanjay Shirsath) यांनी केला आहे. सत्तेची पदं गेल्याने फक्त शिंदे गटातच नाराजी नसून भाजपमध्ये देखील थोडीफार नाराजी आहे, असं शिरसाट म्हणाले आहेत. शिरसाट यांच्या या दाव्यामुळे अजित पवारांची सत्तेत झालेली एन्ट्री भाजपच्या देखील काही लोकांना पटली नसल्याची आता चर्चा होत आहे.

काय म्हणाले संजय शिरसाट? 

काही सत्तेची पदं गेल्यावर आमदारांमध्ये नाराजी असते आणि हे साहजिकच आहे. याला तुम्ही नाराजी किंवा बंडखोरी म्हणू शकत नाही. त्यांनी नाराजी दाखवणे हे सत्य आहे. आता हा प्रकार फक्त एकट्या शिवसेनेत (शिंदे गटात) झाला आहे आणि भाजपमध्ये झाला नाही अशातला भाग नाही. भाजपचे देखील 105 आमदार आहेत. काही अपक्ष त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे त्यांच्यात देखील काही थोडीफार चालणारच आहे. मात्र या दोन्ही पक्षाच्या आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंता करू नका असे सांगितले आहे. तर आपण योग्य तो निर्णय योग्य त्यावेळी घेऊ असे देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याचे शिरसाट म्हणाले आहेत. 'एबीपी माझा'ला प्रतिक्रिया देतांना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 

भाजपमध्येही नाराजी? 

मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या शिंदे गटातील अनेक आमदारांनी यापूर्वीच उघडपणे बोलून दाखवले आहेत. तर भाजपमध्ये देखील काही इच्छुक आहेत. मात्र आजपर्यंत भाजपच्या आमदारांकडून उघडपणे यावर भाष्य करण्यात आले नाही. तर अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे भाजपमधील इच्छुकांची देखील धाकधूक वाढली असावी. पण आतापर्यंत भाजपमधील नाराजीची कधीच उघडपणे चर्चा झाली नाही. मात्र भाजपमध्ये देखील नाराजी असल्याचे वक्तव्य शिरसाट यांनी केल्याने, भाजप आमदारांच्या नाराजीची चर्चा होऊ लागली आहे. 

शिंदे गटाचे दोन आमदार भिडले? 

मंत्रीपदावरून शिंदे गटाच्या इच्छुक आमदारांमध्ये मोठी खदखद असल्याची चर्चा आहे. तर मंत्री असलेल्या लोकांची मंत्रीपद काढून आता ती आम्हाला देण्याची मागणी सुद्धा काही आमदारांनी केली आहे. अशात मंगळवारी झालेल्या एका बैठकीत मंत्रीपदाच्या मुद्यावरून शिंदे गटाचे दोन आमदार भिडले  असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरचा दौरा अर्ध्यावर सोडून मुंबई गाठले आणि दोन्ही आमदारांच्या समजूत काढल्याच बोलले जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

दिल्लीत राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीच्या बैठकीचे होर्डिंग्सवर अजित पवारांचा गद्दार असा उल्लेख, महापालिकेकडून होर्डिंग्स हटवण्यास सुरुवात

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
Rajendra Jain: प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
Bachchu Kadu on Devendra Fadnavis: विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
Sunil Tatkare: सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा

व्हिडीओ

Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha
Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
Rajendra Jain: प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
Bachchu Kadu on Devendra Fadnavis: विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
Sunil Tatkare: सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
India Alliance: पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
Embed widget