एक्स्प्लोर

Barsu Refinery : निवडणुकीच्या जाहीरनाम्यात बारसू रिफायनरी विरोधी भूमिका मांडा, संघटनेचा राजकीय पक्षांना इशारा

Barsu Refinery : ज्या पक्षाच्या जाहीरनामांमध्ये या संदर्भातील भूमिका स्पष्ट असेल, त्यांनाच गावकरी आणि संघटना पाठिंबा देईल, असं संघटनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे

Barsu Refinery : लोकसभा निवडणुकीच्या (Lok sabha Election 2024) पार्श्वभूमीवर बारसू रिफायनरी विरोधी संघटनेतर्फे महाविकास आघाडीला इशारा देण्यात आला आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात  बारसू रिफायनरी विरोधी भूमिका मांडावी आणि तो अजेंडा महाविकास आघाडीचा असावा, अशी मागणी बारसु रिफायनरी विरोधी संघटनेने केली आहे.

...अन्यथा बारसू रिफायनरी विरोधी संघटना आपला उमेदवार उतरवणार

जो पक्ष बारसू रिफायनरी विरोधी अजेंडा निवडणुकीत ठेवेल, ज्यांच्या जाहीरनामांमध्ये त्यांची या संदर्भातील भूमिका स्पष्ट असेल, त्यांनाच गावकरी आणि संघटना पाठिंबा देईल, असं संघटनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. अन्यथा बारसू रिफायनरी विरोधी संघटना आपला उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उभा करणार आहे, तशी तयारी संघटनेकडून दर्शवली गेली आहे.

महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली

महाविकास आघाडीतील नेत्यांनी या सगळ्या मुद्द्यावर आपण गावकऱ्यांसोबत आहोत जनतेसोबत आहोत असं सांगत बारसू रिफायनरी विरोधात आपली भूमिका मांडली. मात्र प्रत्यक्षात जाहीरनाम्यात ही भूमिका असावी अशी मागणी आता संघटनेकडून करण्यात आली आहे. अन्यथा त्या पक्षाला मतं दिली जाणार नाहीत. असं संघटनेच्या वतीने सांगण्यात आलंय. बारसू रिफायनरी विरोधी संघटनांनी महाविकास आघाडीतील या संदर्भात सर्व महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली असून याबाबतची आपली भूमिका मांडली असल्याची माहिती आहे.

नेमका वाद काय?

कोकणातील राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रस्तावित प्रकल्प रद्द केल्याच्या अधिसूचनेनंतर आता बारसूतील सोलगाव परिसरात ती 'क्रूड ऑइल रिफायनिंग' कंपनी प्रस्तावित आहे. तेल शुद्धीकरण क्षेत्रातील 'आरामको' या सौदी अरेबियातील क्रूड ऑइल उत्पादित करणाऱ्या कंपनीसोबत केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. आणि इंडियन ऑइल यांच्या संयुक्त विद्यमाने हा रिफायनरी प्रकल्प या परिसरात सुमारे 13 हजार एकर जागेवर प्रस्तावित आहे. 30 जून 2021 रोजी बारसु -सोलगांव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेची  स्थापना करण्यात आली आहे. बारसू आणि सोलगांव या दोन गावांपैकी सोलगाव या ग्रामपंचायतीनं एमआयडीसी आणि रिफायनरीला विरोध असल्याचा ठराव केला आहे. 28 जून 2021 रोजी याबाबतचा ठराव करण्यात आला आहे. तर, शिवणे खुर्द या गावानं देखील रिफायनरी आणि एमआयडीसी प्रकल्पाला विरोध दर्शवणारा ठराव केला आहे. या नव्या जागेमध्ये राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे, गोवळ, शिवणे खुर्द आणि धाऊलवल्ली या गावांमधील सडा अर्थात जमीन जाणार आहे. त्यामुळे सध्या आता याबाबत देखील विरोध होत असल्याचं दिसून येत आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या>>>

मोठी बातमी! हिंगोलीतील टोकाई सहकारी साखर कारखाना विक्रीला, भाजप नेत्याला दणका!

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस

व्हिडीओ

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला

Embed widget