Nana Patole : देश विकणाऱ्या भाजपला राहुल गांधींवर टीका करण्याचा अधिकार नाही, नाना पटोलेंचे टिकास्त्र
Nana Patole : राहुल गांधींच्या टी-शर्टपेक्षा भाजपनं महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलावं, नाना पटोले भाजपवर निशाणा साधत म्हणाले...
Nana Patole : काँग्रेसच्या (Congress) भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या टी-शर्टवरून भाजपने (BJP) काँग्रेसवर निशाणा साधला. यावर कॉंग्रेस आणि भाजपमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. भाजपच्या टीकेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधलाय. तसेच त्यांनी काँग्रेस अध्यक्षपद, मंत्रीमंडळ विस्तार, अमोल मिटकरी यांच्यासह महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करत निशाणा साधला आहे.
राहुल गांधी टी शर्ट ट्रोलवर नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा
नाना पटोले भाजपवर निशाणा साधत म्हणाले, राहुल गांधींच्या टी-शर्टपेक्षा भाजपनं महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलावं. सत्तेमध्ये येतांना दिलेली वचनं न पाळता शेतकऱ्यांना लुटण्याचं काम केंद्र सरकार करतंय. मुठभर मित्रांना फायदा देण्यासाठी केंद्राचं काम आहे. देश विकणाऱ्यांना राहुल गांधींवर टीका करण्याचा अधिकार नाही. केंद्रानं तपासयंत्रणाचं दुरूपयोग केला आहे. भाजप सत्तापिपासू असल्याचं लोकांच्या लक्षात येतंय.
Bharat, dekho! pic.twitter.com/UzBy6LL1pH
— BJP (@BJP4India) September 9, 2022
अरे... घबरा गए क्या? भारत जोड़ो यात्रा में उमड़े जनसैलाब को देखकर।
— Congress (@INCIndia) September 9, 2022
मुद्दे की बात करो... बेरोजगारी और महंगाई पर बोलो।
बाकी कपड़ों पर चर्चा करनी है तो मोदी जी के 10 लाख के सूट और 1.5 लाख के चश्मे तक बात जाएगी।
बताओ करनी है? @BJP4India https://t.co/tha3pm9RYc
राहुल गांधींनीच काँग्रेसचं अध्यक्ष व्हावं
राहुल गांधींनीच काँग्रेसचं अध्यक्ष व्हावं ही काँग्रेसजनांची ईच्छा आहे. सध्याच्या परिस्थितीत देशाला बाहेर काढण्याचं सामर्थ्य फक्त गांधी परिवारातच आपल्याला अध्यक्षपदाची ऑफर असल्याच्या पार्श्वभूमीवर नाना पटोलेंनी स्पष्टोक्ती दिली आहे.
मिटकरींच्या चौकशीवर प्रतिक्रिया देणार नाही
मी कुणाच्या व्यक्तीगत जीवनात लक्ष घालत नाही, प्रश्न उपस्थित करीत नाही. लोकांच्या प्रश्नावरून लक्ष विचलीत करण्यासाठी अशा गोष्टी पुढे येतात. यापेक्षा जनेतेचे प्रश्न महत्वाचे आहेत. विखे पाटलांच्या, अमोल मिटकरींच्या चौकशीवर प्रतिक्रिया देणार नाही असे नाना पटोले म्हणाले
मंत्रीमंडळाचा विस्तार करायचा नाही, जिल्ह्याला पालकमंत्री द्यायचा नाही
उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक नाही, तेही बिन खात्याचे उमेदवार आहेत. आतापर्यत मंत्रिमंडळाच्या विस्तारात 18 मंत्री करण्यात आले. दुसरा मंत्रीमंडळ विस्तार न करण्यामागे सरकार पडेल ही भिती आहे. जनतेचं नुकसान झालं तरी चालेल. सत्तेमध्ये बसून राज्य कसं विकता येईल, याच्यावरच राज्य सरकार काम करत आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार करायचा नाही. जिल्ह्याला पालकमंत्री द्यायचा नाही, ही लाईन भाजपने घेतली आहे.
गुवाहाटीत महाराष्ट्राच्या राजकारणाची बदनामी झाली
महागाईच्या विषयावर हे सरकार बोलायला सुद्धा तयार नाही. मात्र मलाई खाण्यासाठी ज्या पद्धतीने राज्याची बदनामी करण्यासाठी, गुवाहाटीमध्ये जी काही महाराष्ट्राची बदनामी झाली. महाराष्ट्राच्या राजकारणाची बदनामी झाली, महाराष्ट्राच्या जनतेची झाली, त्याची यांना चिंता नाही. फक्त राज्य विकण्यासाठी आणि राज्यातील जनतेच्या घामाचा पैसा खाण्यासाठी हे सरकार काम करतेय. असं पटोले म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचाही विचार करावा
25 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मान्य केल्यात. परंतु, त्यामध्ये शेतकरी मदतीचा उल्लेख नाहीय. आता सरकारचं गणपती दर्शन झाले असेल तर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचाही विचार करावा. शेतकऱ्यांना पैसे मिळणार की नाही याची शाश्वती नाही. असं पटोले म्हणाले.
संबंधित बातम्या
Bharat Jodo Yatra: काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे' दरम्यान राहुल गांधींच्या टी-शर्टवरून वाद, भाजप-कॉंग्रेसमध्ये खडाजंगी