Deepali Sayed : तुटलेलं घर पुन्हा एकत्र यावं हीच प्रत्येकाच्या मनातील इच्छा : दिपाली सय्यद
माझं दोन्ही ठिकाणी बोलणं झालं आहे. त्यातून मला जे जाणवलं तेच मी बोलले असल्याचे मत शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी व्यक्त केलं.
Deepali Sayed : सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडी दरम्यान मी काही जणांच्या भेटी-गाठी घेतल्या. माझं दोन्ही ठिकाणी बोलणं झालं आहे. त्यातून मला जे जाणवलं तेच मी बोलले असल्याचे मत शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी व्यक्त केलं. प्रत्येकाच्या मनात एकत्र येण्याची इच्छा आहे. हे मला जाणावले आहे. तेच मी ट्वीटवर लिहलं असल्याचे सय्यद म्हणाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उदधव ठाकरे यांनी पुढाकार घ्यायला हवा असेही त्या म्हणाल्या. तुटलेलं घर पुन्हा एकत्र यावं हीच सर्वांची इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितलं.
प्रत्येक शिवसैनिकाला व्यक्त होण्याचा अधिकार
शिवसेनेत दोन गट पडले आहेत. हे दोन गट मला नको आहेत. पूर्णपणे शिवसेना एकत्रीत हवी आहे. यासाठी मी मध्यस्थी करण्याचा निर्णय घेतला आहे. मी शिवसेनेची साधी कार्यकर्ता आहे. प्रत्येक शिवसैनिकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे. त्यानुसार मी माझे मत मांडल्याचे त्या म्हणाल्या. हे तुटलेलं घर पुन्हा एकत्र यावं असे मला वाटत असल्याचं त्यांनी सांगितले. माझ्यावर कारवाई करण्याचा काही संबंध येत नाही. कारण मी मध्यस्थीची भूमिका बजावली आहे.
कार्यकर्ते होरपळत आहेत
दरम्यान, यामध्ये छोटे छोटे कार्यकर्ते होरपळत आहेत. त्या कार्यकर्त्यांच्या मनातील इच्छा मी बोलत आहे. तुम्ही जर मी बोलला नाहीत तर या गोष्टी होणार आहेत. त्यामुळं सर्वांनी बोललं पाहिजे. सर्वांनी एकत्र येण्यातच शिवसेनेचं हित असल्याचेही सय्यद यावेळी म्हणाल्या. मी सगळ्याच आमदारांना सांगत आहे. उद्धव ठाकरे हे आमचे कुटुंबप्रमुख आहेत. त्यांनीसुद्धा सर्वांना सांगितले आहे की मातोश्रीचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. ते हाक मारत आहेत. ते सर्वांना बोलावत आहेत. मात्र, कोणी बोलत नाहीत. लवकरच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे भेटतील असेही त्या म्हणाल्या.
माझं दोन्ही ठिकाणी बोलणं झालं आहे. त्यामुळं बोलण्यात मला जे काही जाणवलं आहे, तेच मी ट्वीटद्वारे लिहलं आहे. माझं कुटुंब तुटता कामा नये, यासाठी मी प्रयत्न करत आहे. प्रत्येकानं शांततेचा पवित्रा घेतला तर काही अडचण येणार नाही. लवकरात लवकर या गोष्टी थांबतील आणि पुन्हा एकदा शिवसेना एकत्र यावी एवढीच इच्छा असल्याचे सय्यद यांनी सांगितलं.
दिपाली सय्यद यांचे ट्वीट
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांना भेटणार असल्यासंदर्भात शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी ट्वीट केलं आहे. या भेटीसाठी मध्यस्थी केल्याबद्दल भाजपचे धन्यवाद देखील दिपाली सय्यद यांनी मानले आहेत. दिपाली सय्यद यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करुन पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरं वाटलं. शिंदे साहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव साहेबांनी कुटुंबप्रमुखांची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झाले आहेत. या मध्यस्तीकरता भाजप नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद, चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल, असं ट्वीट शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
- येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांना भेटणार? दिपाली सय्यद यांच्या ट्विटमुळं चर्चांना उधाण
- Shivsena : 'शिवसेनेतून गेले ते बेन्टेक्स, राहिले ते सोनं' म्हणणारे खासदार मंडलिक शिंदे गटात?