Eknath Shinde : ठाकरे सरकार धोक्यात; एकनाथ शिंदेंसोबतच्या आमदारांचा फोटो व्हायरल, स्वतंत्र गट स्थापन होणार!
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात गेल्याची चर्चा सुरू झाली आहे.
![Eknath Shinde : ठाकरे सरकार धोक्यात; एकनाथ शिंदेंसोबतच्या आमदारांचा फोटो व्हायरल, स्वतंत्र गट स्थापन होणार! Maharashtra political crisis eknath shinde may form independent group of shivsena mla mahavikas aghadi may loose goverment Eknath Shinde : ठाकरे सरकार धोक्यात; एकनाथ शिंदेंसोबतच्या आमदारांचा फोटो व्हायरल, स्वतंत्र गट स्थापन होणार!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/22/fdf733b66edaf10c6028a72d9cb1703c_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Eknath Shinde : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आता स्वतंत्र गट स्थापन करण्याची आता दाट शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा फोटो व्हायरल झाला आहे. शिंदे यांनी स्वतंत्र गटासाठी आवश्यक असलेली 37 ही संख्या पूर्ण केली असल्याचे सध्या चित्र आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुंबईत दाखल झाले आहेत. आज भाजप आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या घडामोडी घडणार आहेत.
सूरतमध्ये मंगळवारी दिवसभरानंतर रात्री उशिराही राजकीय घडामोडी घडल्या आहेत. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू हेदेखील शिवसेनेच्या आमदारांसोबत आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाला आहे. व्हिडिओत आमदार एका निवेदनावर स्वाक्षरी करत असल्याचे दिसत आहे. हे निवेदन विधानसभेत स्वतंत्र गटासाठी मान्यता द्यावी यासाठी होते असल्याचे म्हटले जात आहे.
सरकार अल्पमतात?
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचे पत्र आज राजभवनात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर सरकार अल्पमतात असल्याचे सांगून लवकरच विश्वासदर्शक ठराव सिद्ध करण्याचे आदेश राज्यपाल देण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्या 37 आमदारांच्या गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाल्यास सरकार थेट अल्पमतात जाण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोणते आमदार ?
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या काही आमदारांची नावे समोर आली आहे. यामध्ये ईडी, आयकर विभागाच्या चौकशीचा ससेमिरा लागलेले प्रताप सरनाईक, यामिनी जाधव यांचाही समावेश आहे.
1. प्रताप सरनाईक
2. श्रीनिवास वनगा
3. अनिल बाबर
4. नितिन देशमुख
5. लता सोनवणे
6. यामिनी जाधव
7. संजय शिरसाट
8. महेंद्र दळवी
9. भारत गोगवले
10. प्रकाश सर्वे
11. सुहास कांदे
12. बच्चू कडु , प्रहार पार्टी
13 नरेन्द्र बोंडेकर , अपक्ष आमदार अमरावती
14 संजय गायकवाड़
15 संजय रायमूलकर
16 बालाजी कल्याणकर
17 रमेश बोरनारे
18 चिमणराव पाटील
19 किशोर पाटील
20 नितीनकुमार तळे
21 संदीपान भुमरे
22 महेंद्र थोरवे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)