Maharashtra Omicron Cases : राज्यात आज ओमायक्रॉनच्या 85 रुग्णांची नोंद, सर्वाधिक रुग्ण पुणे शहरात
Maharashtra Omicron Cases : राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 3125 रुग्ण सापडले असून त्यापैकी 1674 रुग्ण हे बरे झाले आहेत.
मुंबई: राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत मात्र काहीशी चढ-उतार होत असल्याचं पहायला मिळतंय. राज्यात आज ओमायक्रॉनच्या 85 रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक म्हणजे 44 रुग्ण हे पुणे शहरात सापडले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 3125 रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 1674 रुग्ण हे बरे झाले आहेत.
राज्यात आतापर्यंत 6605 लोकांची ओमायक्रॉन चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 6505 अहवाल प्राप्त झाले आहेत. 100 नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
राज्याची स्थिती
राज्यात गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 27 हजार 971 नव्या रुग्णांची भर पडली असून 61 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 50 हजार 142 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्याचा मृत्यूदर 1.85 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 72 लाख 92 हजार 791 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.91 टक्के आहे.
मुंबईतील स्थिती
मागील 24 तासांत मुंबई 1 हजार 411 नवे कोरोना (Corona) रुग्ण आढळले आहेत. ज्यामुळे मुंबईत सद्यस्थितीला 12 हजार 187 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत. मुंबईत शनिवारी 11 जणांच्या मृत्यूची नोंद आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 602 झाली आहे. तर मागील 24 तासांत तब्बल 3 हजार 547 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट वाढून 97 टक्के झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: