(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update : राज्यात आज 27,971 रुग्णांची नोंद, 61 जणांचा मृत्यू
Maharashtra Corona Update : राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 94.91 टक्क्यांवर पोहोचलं असून मृत्यू दर 1.85 टक्के आहे.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 27 हजार 971 नव्या रुग्णांची भर पडली असून 61 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 50 हजार 142 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज 85 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 85 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत 3125 ओमायक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी 1674 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 61 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 61 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.85 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 72 लाख 92 हजार 791 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.91 टक्के आहे. सध्या राज्यात 11 लाख 49 हजार 182 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3,375 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 43 लाख 33 हजार 720 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईतील स्थिती
गेल्या 24 तासांत मुंबई 1 हजार 411 नवे कोरोना (Corona) रुग्ण आढळले आहेत. ज्यामुळे मुंबईत सद्यस्थितीला 12 हजार 187 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत. मुंबईत शनिवारी 11 जणांच्या मृत्यूची नोंद आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 602 झाली आहे. तर मागील 24 तासांत तब्बल 3 हजार 547 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट वाढून 97 टक्के झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: