एक्स्प्लोर

मुंबईकरांना दिलासा! नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या दुप्पट

Mumbai Coronavirus Cases : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

Mumbai Coronavirus Cases : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मुंबईत नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कोरोनामुक्त रुग्णांची संख्या दुप्पट आहे. मुंबईमधील नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवस सातत्याने कमी होत आहे. सध्या ही संख्या एक ते दीड हजारांमध्ये असल्याचे गेल्या काही दिवसांत दिसत आहे. तसेच नव्याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 
बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत मुंबई 1 हजार 411 नवे कोरोना (Corona) रुग्ण आढळले आहेत. ज्यामुळे मुंबईत सद्यस्थितीला 12 हजार 187 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत. मुंबईत शनिवारी 11 जणांच्या मृत्यूची नोंद आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 602 झाली आहे. तर मागील 24 तासांत तब्बल 3 हजार 547 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट वाढून 97 टक्के झाला आहे.  

दिनांक मुंबईतील रुग्णसंख्या
10 जानेवारी 13,648
11 जानेवारी 11,647
12 जानेवारी 16,420
13 जानेवारी 13, 702
14 जानेवारी 11, 317
15 जानेवारी 10, 661
16 जानेवारी 7, 895
17 जानेवारी 5, 956
18 जानेवारी 6, 149
19 जानेवारी 6, 032
20 जानेवारी 5,708
21 जानेवारी 5,008
22 जानेवारी 3,568
23 जानेवारी 2,250 
24 जानेवारी 1,857
25 जानेवारी 1,815
26 जानेवारी 1,858
27 जानेवारी 1,384 
28 जानेवारी 1,312 
29 जानेवारी 1411

सध्या मुंबईतील 13 इमारती सील करण्यात आल्या आहेत. तसंच आज नव्याने सापडलेल्या 1 हजार 411रुग्णांपैकी 187 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोना वाढीचा  दुप्पटीचा दर 322 दिवस इतका झाला आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 0.21% इतका झालाय. 

धारावीत 39 दिवसानंतर शून्य रुग्णांची नोंद
कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच शुक्रवारी (28 जानेवारी) धारावीत एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही. धारावीत 20 डिसेंबर 2021 या दिवशी एकही कोरोनाबाधित रुग्ण आढललेला नव्हता. तिसऱ्या लाटेनंतर धारावीमध्ये एका दिवसात कोरोनाची शून्य प्रकरणे नोंदवण्यास 39 दिवस लागले. दुसऱ्या लाटेदरम्यान 14 जून 2021 रोजी शून्य रुग्णसंख्येची नोंद होण्यासाठी 119 दिवसांचा कालावधी लागला. तर पहिल्या लाटेनंतर 20 डिसेंबर 2020 रोजी धारावीत शून्य रुग्णसंख्येची नोंद झाली होती. यासाठी तब्बल 269 दिवसांचा कालावधी लागला होता. अशी माहिती मुंबई महानगरपालिकेनं दिलीय. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Umar Khalid Bail Denied: 'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, संतोष धुरी यांचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरींचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, भाजप प्रवेश ठरला

व्हिडीओ

Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Umar Khalid Bail Denied: 'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, संतोष धुरी यांचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरींचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, भाजप प्रवेश ठरला
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
Embed widget