एक्स्प्लोर
राहुल गांधींच्या समर्थनार्थ राज्यातील विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये, अशी काँग्रेस नेत्यांची मागणी आहे. यासाठी काँग्रेसच्या अनेक प्रदेशाध्यक्षांनी आणि जवळपास 120 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस पक्षाच्या दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. परंतु महाराष्ट्रातील काँग्रेसमधील अनेक निष्क्रिय पदाधिकारी मात्र पदाला चिकटून राहत असल्याचे सांगत आता विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीच राजीनामा देण्याचा पवित्रा स्विकारला आहे. महाराष्ट्र राज्य विद्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष सागर साळुंखे यांच्यासह एनएसयुआयच्या इतर पदाधिकाऱ्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर सुरु झाल्यानंतर राहुल गांधींनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र पक्षाचा इतका दारुण पराभव होऊनही राज्यातील अनेक निष्क्रिय पदाधिकारी पदाला चिकटून राहत असल्याने विद्यार्थी काँग्रेसच्या उपाध्यक्षाने नैतिक जबाबदारी स्विकारत राजीनामा दिला आहे. "लोकसभा निवडणुकीत झालेला पक्षाचा लाजीरवाणा पराभव काँग्रेसचा कार्यकर्ता या नात्याने जिव्हारी लागला असून पदाला चिकटून राहण्यात स्वारस्य नसल्याने राजीनामा दिला आहोत", असे सागर यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे. त्यानंतर विद्यार्थी काँग्रेसच्या इतरही पदाधिकाऱ्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये, अशी काँग्रेस नेत्यांची मागणी आहे. यासाठी काँग्रेसच्या अनेक प्रदेशाध्यक्षांनी आणि जवळपास 120 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. काँग्रेसचे किसान काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राहुल गांधींच्या समर्थनार्थ त्यांनी राजीनाम्याचे पाऊल उचललं आहे. लोकसभेतील पराभवाची जबाबदारी घेत नाना पटोले यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेस सचिव आणि काँग्रेसचे राजस्थान सह-प्रभारी तरुण कुमार यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement