Maharashtra News : कोरोना काळात डॉक्टरांच्या कमतरतेमुळे झालेले हाल बघता राज्य सरकार 'अॅक्शन मोडमध्ये'; आरोग्य क्षेत्रात मोठे निर्णय घेण्याची शक्यता
राज्य सरकार हे अॅक्शन मोडमध्ये आलेलं बघायला मिळत आहे.
Maharashtra News : गेल्या दोन वर्षांच्या कोरोना कालखंडात अनेक ठिकाणी डॉक्टरांच्या कमतरतेमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले ही बाब लक्षात घेता व जागतिक आरोग्य संघटनेने ठववून दिलेल्या एक हजार लोकसंख्येला एक डॉक्टर या निकषाला लक्षात घेऊन देशातील अनेक राज्यात सरकारे आरोग्य सेवेत पुन्हा असं होऊ नये म्हणून आमूलाग्र बदल करीत असल्याच चित्र आहे, त्यानुसार महाराष्ट्र राज्य सरकार हे अॅक्शन मोडमध्ये आलेलं बघायला मिळत आहे.
Maharashtra Corona News : देशात डॉक्टरांची कमतरता.....!
जागतिक आरोग्य संघटनेने काही निकष ठरवून दिलेले असतात, त्यापैकी एक म्हणजे एक हजार लोकसंख्येला किमान एक डॉक्टर आवश्यक आहे , आपल्या राज्यात डॉक्टरांची सध्याची स्थिती अतिशय बिकट आहे, राज्यात एक हजार लोकसंख्ये साठी फक्त 0.84 इतकेच डॉक्टर आहेत. म्हणून ही तूट भरून काढण्यासाठी केंद्र व राज्य सरकार अनेक पावले उचलणार आहे , यात विशेष म्हणजे देशाच्या नीती आयोगाने इतक्यात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजेच PPP या तत्वावर नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यास मान्यता दिली आहे.
Maharashta राज्यात 16 जिल्ह्यात 1600 MBBSच्या जागा वाढणार
डॉक्टरांची संख्या वाढवायची असेल तर राज्यातील वैदयकीय महाविद्यालयात MBBSच्या नवीन जास्तीच्या जागा वाढवाव्या लागतील व ज्या जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालत नाहीत अशा काही जिल्ह्यात नवीन वैदयकीय महाविद्यालये सूर करावी लागतील यानुसार राज्यातील बुलढाणा , अहमदनगर, अमरावती, हिंगोली,जालना,नाशिक,पालघर,रत्नागिरी या जिल्ह्यात सरकार PPP तत्वावर नवीन वैदयकीय महाविद्यालये सुरू करण्याच्या विराधीन आहे तर जुन्या शासकीय महाविद्यालयात प्रत्येकी 50-50 नवीन जागा वाढविण्याचा प्रस्ताव सरकारचा आहे. त्यामुळे येत्या 2026 पर्यंत डॉक्टर व रुग्ण लोकसंख्या यातील दरी जवळपास नाहीशी होण्यात असल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयाचे माजी संचालक डॉ.अविनाश सुपे यांनी सांगितलं आहे.
महाराष्ट्र (Maharashta) हॉस्पिटलमध्ये स्पेशालिटीच्या ही जागा वाढनार
राज्यात चांगली व दर्जेदार आरोग्य सेवा जनतेला मिळावी म्हणून राज्यातील सुपरस्पेशालिटी रुग्णालयांची संख्या व क्षमता वाढविण्या सोबत वैद्यकीय महाविद्यालयात सुपर स्पेशालिटीच शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांचीही संख्या वाढविली जाणार आहे. त्यामुळे उच्च वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या किंवा इच्छूक असणाऱ्या विध्यार्थ्याना या कोर्सेस साठी प्रवेश मिळणार आहे.
वैद्यकीय सेवेत इच्छूक गुंतवणूकदारांची सरकार सोबत बैठक
26 एप्रिल रोजी मुंबईत आगामी काळात जर PPE तत्वावर नवीन आरोग्य सुविधा किंवा नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये सुरू करायचे असतील तर इच्छूक गुंतवणूकदारांना आमंत्रित करावं लागणार याचा पहिला टप्पा म्हणून काल मुंबईत इच्छूक गुंतवणूकदारांची सरकारच्या प्रतिनिधींसोबत एक बैठक झाली या बैठकीला मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन मार्गदर्शन ही केलं. त्यानुसार आता सरकार आरोग्य क्षेत्रासाठी एक्शन मोड मध्ये बघायला मिळत आहे. मात्र अस झालं तर राज्यातील जनतेला आरोग्य क्षेत्रात अच्छे दिन नक्कीच बघायला मिळतील.
इतर महत्त्वाच्या बातम्या: