(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यात आता खुल्या आणि बंदिस्त जागेतील सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी
22 ऑक्टोबरपासून बंदिस्त, खुल्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रम घेता येणार आहे. त्यामुळे यंदा दिवाळी पहाट आणि पाडवा पहाटसारखे कार्यक्रम घेता येणार आहे
मुंबई : कोविडच्या पार्श्वभूमीमुळे गेले अनेक महिन्यांपासून सभागृह आणि सांस्कृतीक कार्यक्रम बंद होते. राज्यातील कोरोनाचा विळखा हळूहळू सैल होत आहे त्यामुळे आता टप्प्याटप्याने निर्बंध शिथील करण्यात येत आहे. राज्यात आता खुल्या आणि बंदिस्त जागेतील सांस्कृतिक कार्यक्रमांना परवनगी देण्यात आली आहे. 22 ऑक्टोबरपासून बंदिस्त, खुल्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रम घेता येणार आहे. त्यामुळे यंदा दिवाळी पहाट आणि पाडवा पहाटसारखे कार्यक्रम घेता येणार आहे
काय आहे नियमावली?
- कार्यक्रमाला प्रवेशा देताना प्रेक्षकांचे तापमान बंधनकारक
- गर्दी नियंत्रणासाठी आयोजकांकडे सुरक्षा व्यवस्था असावी
- कार्यक्रमाचे आयोजक, प्रेक्षक सर्वांना मास्क घालणे बंधनकारक
- बालकलाकारांव्यतिरिक्त सर्वांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक
- बंदिस्त सभागृह 50% क्षमतेने सुरू करणार
- मात्र कोविडच्या नियमांचं पालन कराव लागणार आहे
- सभागृहातील एसी 24 ते 30 अंश सेल्सिअस मर्यादित असली पाहिजे
- मोकळ्या जागेतील आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम
- प्रेक्षकांना कलाकार कक्षात जाण्यास परवानगी नाही
- कार्यक्रम संपल्यानंतर सभागृहाचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक
- कार्यक्रमाच्या ठिकाणी खाद्यपदार्थ, पेये विक्रीस बंदी
- कार्यक्रमांच्या वेळी सर्व उपकरणांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे
- मोकळ्या जागेतील कार्यक्रमासाठी दोन व्यक्ती मधील अंतर सहा फूट असावे
- सहभागी होणाऱ्या कलाकारांचे दोन ही डोस होणं महत्वाचे
राज्यात काल 1736 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
राज्यात कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 1 हजार 736 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 033 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 04 हजार 320 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के आहे. दरम्यान, राज्यात आज 36 कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा झाला आहे.. राज्यात सध्या कोरोनाचे 32 हजार 115 सक्रीय रुग्ण आहेत.