Ramadan 2022 : रमजाननिमित्त खजूरचा बाजार फुलला, कसा ओळखायचा ओरिजनल खजूर?
Ramadan 2022 : रमजाननिमित्त पहिल्यांदाच विदेशातून वेगवेगळ्या प्रकारचे खजूर बाजारात दाखल झाले आहेत
Ramadan 2022 : इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे मागच्या दोन वर्षांमध्ये सर्व सण आणि उत्सवावर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे दिवाळी असो की रमजान ईद हे मोठे सण उत्साहात साजरे करता आले नाहीत. यावर्षी मात्र सण उत्सवावरील निर्बंध हटवल्याने रमजानचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय आणि याच रमजान महिन्यात वेगवेगळ्या प्रकारचा सुकामेवा बाजारात उपलब्ध झाला आहेत.
रमजाननिमित्त पहिल्यांदाच विदेशातून वेगवेगळ्या प्रकारचे खजूर बाजारात दाखल झाले आहेत. खजुराचे हे वेगवेगळे प्रकार बाजारात दाखल झाले असले तरी महागाईमुळे खजुरासह इतर सुक्यामेव्याचे देखील भाव काही प्रमाणात वाढले आहेत
रमजान म्हटलं की, रोजा इफ्तार करण्यासाठी सुकामेवा मोठ्या प्रमाणात दररोज खरेदी केली जातो. त्यामध्ये सर्वात जास्त खजूराची विक्री केली जाते. हे खजूर इराक, इराण, सौदी अरेबिया आणि दुबईहून हे खजूर भारतात येतात. यावर्षी या खजुराची आवक जास्त प्रमाणात झाली असली तरी किरकोळ बाजारात मात्र जुन्या खजुराचा माल विक्रीसाठी आणून कमी भावात त्याची विक्री केली जात आहे. त्यामुळे कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेल्या चांगल्या प्रतीच्या खजुराची खरेदी ग्राहकांनी करावी असा आवाहान काही व्यापाऱ्यांनी केले आहे
दोन वर्ष सणावर निर्बंध असल्याने रमजानचा सण घरात राहूनच साजरा करावा लागला यावर्षी मात्र ड्रायफूट खरेदी करण्यासाठी बाजारात लोकांची गर्दी वाढली आहे. तर दुसरीकडे मात्र महागाईमुळे अनेकांनी खरेदीसाठी आखडता हात घेतला आहे. ड्रायफूट आणि खजूर खरेदी करण्यासाठी गर्दी होत असली तरी खजूर विकत घेताना त्याची तारीख आणि पॅकिंग पाहूनच खरेदी करा.
संबंधित बातम्या :
Ramadan 2022 : इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्याला सुरुवात, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा