काळ्या बुरख्यात दिसली अभिनेत्री हिना खान, चाहत्यांना दिल्या रमजानच्या शुभेच्छा!
Written By : abp majha web team | Updated at : 03 Apr 2022 01:25 PM (IST)
(photo:realhinakhan/ig)
1/7
कालपासून पवित्र रमजान महिना सुरू झाला आहे. इस्लामच्या सर्वात पवित्र महिन्यांपैकी एक, रमजान महिन्याची सुरुवात प्रत्येक मुस्लिम नमाज आणि उपवासाने करतो.(photo:realhinakhan/ig)
2/7
सर्वसामान्यांपासून ते अनेक मुस्लीम सेलिब्रिटीदेखील रमजान महिन्याचे स्वागत विशेष प्रार्थना करत आहेत. अभिनेत्री हिना खाननेही रमजान महिन्याची खास पद्धतीने सुरुवात केली...(photo:realhinakhan/ig)
3/7
बोल्ड आणि ग्लॅमरस हिना खान पवित्र रमजान महिन्याच्या सुरुवातीला बुरख्यात दिसली. अभिनेत्रीने काळ्या बुरख्यातील तिचे साधे फोटो शेअर केले आहेत.(photo:realhinakhan/ig)
4/7
एका फोटोत हिना खान तिच्या आईसोबत दिसत आहे. अभिनेत्रीची आई देखील हिनाप्रमाणे काळा बुरखा आणि काळा सनग्लासेसमध्ये दिसत आहे.(photo:realhinakhan/ig)
5/7
चाहत्यांनी हिना खानचे ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटो नेहमीच पाहिले आणि पसंत केले आहेत, परंतु बुरख्यातील अभिनेत्रीचा लूक देखील चाहत्यांकडून पसंत केला जात आहे.(photo:realhinakhan/ig)
6/7
हिनाच्या फोटोंना आतापर्यंत लाखो लोकांनी लाईक केले आहे. कमेंट सेक्शनमध्ये चाहते अभिनेत्रीचे कौतुक करत आहेत. त्याचबरोबर अनेकांनी अभिनेत्रीला रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत.(photo:realhinakhan/ig)
7/7
हिना खाननेही डोक्यावर स्कार्फसह काळा बुरखा घातला आहे. हिनाने बुरख्यासोबत काळा सनग्लासेसही लावला आहे.(photo:realhinakhan/ig)