(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Omicron Variant : दिलासा! राज्यातील पहिला ओमायक्रॉनबाधित रुग्ण कोरोनामुक्त
राज्यातील पहिला ओमायक्रॉनबाधित (Omicron) रुग्ण कोरोनामुक्त झाला असून केडीएमसीच्या रुग्णालयातून आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कल्याण - डोंबिवली : दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून डोंबिवलीत आलेला एक राज्यातील पहिला ओमिक्रॉनबाधीत (Omicron) रुग्ण बरा झाला असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाची लागण झाल्याने यांच्यावर उपचार सुरु होते. रुग्णाला पुढचे 7 दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला रुग्णालयाने यांनी दिला आहे.
27 नोव्हेंबरपासून हा रुग्ण केडीएमसीच्या कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत होता. त्याला कोणतीही लक्षण नव्हती त्याची प्रकृती स्थिर असून त्याचा आरटीपीसीआर अहवाल निगेटीव्ह आल्याने या रुग्णाला आज डिस्चार्ज देण्यात आला. डोंबिवलीत आढळलेला रुग्ण हा देशातील पहिला रुग्ण डिस्चार्ज झाला आहे. विशेष म्हणजे आज या रुग्णाचा वाढदिवस आहे आणि त्याच दिवशी त्याने कोरोनावर मात केल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. उर्वरित नायजेरियामधून आलेल्या त्या चार कोरोनाबाधित रुग्णाच्या जिनोम सिक्वेन्सिंग अहवालाची अद्यापी प्रतीक्षा असल्याचे ते म्हणाले.
दक्षिण आफ्रिका केपटाऊनहून हा रुग्ण दुबई, दिल्ली ते मुंबई असा प्रवास करुन 22 नोव्हेंबर रोजी डोंबिवलीत आला होता. त्याला ताप आल्याने त्याने स्वत: जाऊन डॉक्टरकडे तपासणी केली. टेस्ट केली असता त्याची कोरोना टस्ट पॉझिटिव्ह आली होती. महापालिकेने त्याची गंभीर दखल घेत 27 नोव्हेंबर रोजी त्याला महापालिकेच्या आर्ट गॅलरीतील कोविड रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवले. त्याचे नमुने जीनोम सिक्वेसिंगकरता एनआयव्हीला पाठविले होते. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
राज्यातील हा पहिला ओमायक्रॉनचा रुग्ण असल्याने कल्याण डोंबिवलीसह राज्याची धास्ती वाढली होती. त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची टेस्ट निगेटिव्ह आली होती. या रुग्णाला कोणतेही लक्षणे आढळून आली नव्हती. त्याची प्रकृती स्थिर होती. रिपार्ट आल्यानंतर त्याची महापालिकेने पुन्हा कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट केली. त्याचा रिपार्ट निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. रुग्णाचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्याला आज डिस्चार्ज देण्यात आला. मात्र त्याला पुढील सात दिवस होम आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Omicron : लसीकरणाचा 12 कोटींचा टप्पा पार, 4.37 कोटी नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस; राजेश टोपेंची माहिती
ओमायक्रॉनचा झपाट्याने प्रसार, लसीकरणाचा वेग वाढवा; मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश
... तर भारतात कोरोनाची भयंकर तिसरी लाट येणार, IMAचा इशारा