ओमायक्रॉनचा झपाट्याने प्रसार, लसीकरणाचा वेग वाढवा; मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Omicron Cases In India : जेथे लसीकरण कमी आहे तिथे ते वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले.
![ओमायक्रॉनचा झपाट्याने प्रसार, लसीकरणाचा वेग वाढवा; मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश Increase vaccination says cm Uddhav thackeray in Maharashtra Cabinet Meeting ओमायक्रॉनचा झपाट्याने प्रसार, लसीकरणाचा वेग वाढवा; मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/19/ed1495969b56ea029b193038a1abdef6_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Cabinet Meeting : दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार झपाट्याने होत आहे. महाराष्ट्रातही ओमायक्रॉन व्हेरियंटचे 10 रुग्ण आढळले आहेत. राज्य मंत्रीमंडळाची आज बैठक पार पडली, यामध्ये ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता लसीकरण वेगानं वाढवण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रीमंडळ बैठकीत दिले आहेत.
ओमायक्रॉन विषाणुच्या संसर्गाचा वेग अतिशय जास्त असून त्याला रोखण्यासाठी राज्यातील लसीकरण देखील वेगाने वाढले पाहिजे, यादृष्टीने जेथे लसीकरण कमी आहे तिथे ते वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले. महाराष्ट्राने सध्या 12 कोटी 3 लाख 18 हजार 240 डोसेस दिले असून 4 कोटी 37 लाख 46 हजार 512 जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. 7 कोटी 65 लाख 71 हजार 728 लोकांनी एक डोस घेतला आहे. 18 ते 44 वयोगटात 76.69 लोकांनी कमीत कमी 1 डोस तर 45 पेक्षा अधिक वयोगटातील 85.25 टक्के लोकांनी एक डोस घेतलेला आहे.
गेल्या 12 तासात संपूर्ण जगात ओमायक्रॉनच्या रुग्णात 45 टक्के वाढ झाली असून 54 देशात याचा प्रसार झाला आहे. फ्रान्समध्ये दैनंदिन रुग्ण 40 हजारच्या पुढे आढळत असून जर्मनीत ही संख्या 50 हजाराच्या आसपास आहे. ऑस्ट्रेलियामध्ये देखील कोविड सुरु झाल्यापासून सगळ्यात मोठी लाट आली असून दररोज 7 हजारच्या आसपास नवीन रुग्ण आढळत आहेत. अमेरिकेत देखील नोव्हेंबर 2020 सारखी परिस्थिती उद्भवली असून दररोज एक लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. दक्षिण आफ्रिकेत गेल्या 2 आठवड्यात नवीन रुग्णात मोठी वाढ झाली असून दररोज दुपटीने रुग्ण आढळत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील काळजी घेण्याची गरज असून आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळले गेलेच पाहिजे यावर भर देण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला निर्णय...@samant_uday pic.twitter.com/qkFaaVy7jE
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 8, 2021
मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेले निर्णय -
उच्च व तंत्र शिक्षण विभाग : नागपूर येथील राष्ट्रीय विधि विद्यापीठासाठी वारंगा येथे विद्यार्थी वसतिगृह आणि इतर निवासी इमारती बांधकामासाठी निधी
उच्च व तंत्र शिक्षण विभाग : कोविड 19 पार्श्वभूमीवर स्वंय अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्यासाठी इरादा पत्राचा कालावधी वाढवणार.
कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद या संस्थांचे विलीनीकरण करून महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ निर्माण करण्याचा निर्णय.
महसूल विभाग : महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 मधील कलम- 2 (g) (iv) आणि सदर नि अधिनियमाच्या अनुसूची 1 च्या अनुच्छेद 25 (da) मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय
पणन विभाग : बाजार समित्या मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन अधिनियम 1963 मध्ये सुधारणा
उच्च व तंत्र शिक्षण विभाग : शासकीय न्यायसहाय्यक विज्ञान संस्थांमधून पदवी आणि पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये इंटर्नशिप
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)