एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : सगळे प्रकल्प गुजरातला, महाराष्ट्रातील युवकांनी आरत्या, हनुमान चालीसा पठण करा : छगन भुजबळ 

Chhagan Bhujbal : महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातून एका पाठोपाठ एक उद्योग प्रकल्प गुजरातला (Gujrat) जात आहेत.

Chhagan Bhujbal : महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातून एका पाठोपाठ एक उद्योग प्रकल्प गुजरातला (Gujrat) जात आहेत. मात्र अशा प्रकल्प पळवापळवीमुळे राज्यातील युवकांचा रोजगार (Employment) हिसकावला जात आहे. त्यामुळे राज्यातील युवकांनी आता करायचे काय तर? आरत्या करा, हनुमान चालीसा पठण करा (Hanuman Chaliasa), दहीहंडी फोडा, फटाके फोडा अशी यादीच छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सुचवली आहे. 

आज सकाळपासून एअर बस (Air Bus) संदर्भात टाटा एअरबस प्रकल्प (Tata Airbus Project) राज्याबाहेर गेल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दुसरा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याने शिंदे-फडणवीस (Shinde Fadnavis Government) सरकारवर टीका सुरू झाली आहे. अशातच माजी मंत्री छगन भुजबळ यांनी शिंदे फडणवीस सरकारला धारेवर धरले असून फडणविस याबाबत लक्ष घालून महाराष्ट्रातील प्रकल्प राज्यातच होण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे भुजबळांनी म्हटले आहे. 

छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत एअर बसचा प्रकल्प याबाबत आपणही पाठपुरावा केल्याचे सांगत भूमिका मांडली. ते म्हणाले. एअर बस प्रकल्प हा 22 हजार कोटी ची गुंतवणूक असून पुढे वाढणार आहे. मागील वर्षी भारताने या कंपनीशी करार केला. त्यानंतर 31 ऑक्टोबर 2021 ला मी स्वतः रतन टाटा याना पत्र पाठवले.  हा प्रकल्प नाशिकच्या ओझर येथील H AL कारखान्यात तयार करा अशी मागणी केली होती. मात्र महाविकास सरकारच्या काळात आमच्याकडे अन्न पुरवठा पुरवठा खाते असल्याने, शिवाय कोरोना आल्यानंतर हा विषय बाजूला पडला. मी पत्र दिले मात्र त्याला उत्तर आले नसल्याचा निर्वाळा भुजबळांनी यावेळी दिला. 

ते पुढे म्हणाले, एकापाठोपाठ एक प्रकल्प गुजरात ला जात आहेत. महाराष्ट्र मधील युवकांनी काय करायचे? आरत्या करा, हनुमान चाळीसा पठण करा, दहीहंडी खेळा असा जाब सल्ला यावेळी त्यांनी दिला. सरकार कोणाचे असो फडणवीस माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या शब्दाला दिल्लीत वजन आहेत. एकनाथ शिंदे करू शकणार नाही, पण देवेंद्र करू शकले असते. मोदींनी देशाचे नेते म्हणून वागले पाहिजे, गुजरातचा विकास आधीच घडला असे म्हणतात मग आता प्रकल्प नेण्याची गरज काय? दिल्लीत जे नेते काम करत आहेत, त्यांनी लक्ष घातले पाहिजे होते. आता आम्ही प्रयत्न केले तरीही झालेला निर्णय मागे घेतला जाईल का याबाबत साशंकता असल्याचे म्हणाले. 

बेरोजगारी वाढली... 
सध्या महागाई वाढते असून बेरोजगारी वाढते आहे. अशा वेळी नोटांवर कोणाचे फोटो छापयाचे यावरून वादंग सुरू झाले. निरर्थक विषयांना महत्व दिले जात असून आपल्याकडे देव खूप आहेत, महापुरुष खूप आहेत कोणा कोणाचे फोटो छापयाचे, हा वाद सुरु आहे. केजरीवाल यांच्यांकडून अपेक्षा नसल्याचे ते म्हणाले. वैद्यकीय शिक्षण मातृभाषामध्ये देण्याची चर्चा अनेक वर्षांपासून आहे, मात्र आता ते कितपत शक्य होईल हा प्रश्न आहे. परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्यानी काय करावे. यापेक्षा मेडिकल कॉलेज सुरू करा, इतर कामावरील खर्च कमी करा. तसेच नाशिक मुंबई महामार्गावरील खड्ड्यांमुळे स्पॉंडेलसीसचा त्रास सुरू झालारस्त्याचे काम सुरू आहे, 1 तारखे पासून आंदोलन करण्याची गरज पडणार नाही असे वागावे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget