Narhari Zirval : माझ्या मतदारांचे धन्यवाद, माझ्यासारख्या गबाळ्या माणसाला तीन वेळा आमदार केलं : आमदार झिरवाळ
Narhari Zirval : आज खेडोपाडी आदिवासी दिन साजरा, आदिवासी दिनाची शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी आमदार झिरवाळ यांनी केली.
Narhari Zirval : आज प्रत्येक खेडोपाडी आदिवासी क्रांती दिन साजरा होत आहे. आज मी मुंबईत आहे, पण माझ्या दिंडोरी मतदारसंघातील जनता अतिशय सुज्ञ असून म्हणून माझ्यासारख्या अशा गबाळ्या माणसाला तीन वेळा आमदार केलं, मी त्यांना मनापासून धन्यवाद देईन, अशा शब्दांत आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी मतदारसंघातील आभार मानत सरकारला शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी विनंती केली आहे.
आज देशभरात जागतिक आदिवासी दिन (World Trible Day) साजरा होत आहे. महाराष्ट्रातही खेडोपाडी मोठ्या उत्साहात आदिवासी दिन साजरा केला जात आहे. नेहमीच चर्चेत असलेले नरहरी झिरवाळ हे नेहमीप्रमाणे विधिमंडळात आदिवासी दिन साजरा करत असून आपल्या आदिवासी पेहरावाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. याचवेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आज देशभरात जागतिक आदिवासी दिन साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी देखील हुतात्मा मैदानावर सुंदर असा कार्यक्रम साजरा केला. आज विधिमंडळात आदिवासी दिन साजरा करण्याचे चौथे वर्ष आहे, या सर्वांचे मनापासून आभार.
झिरवाळ पुढे म्हणाले की, "आदिवासी दिन हा सर्वस्तरावर साजरा केला जातो. त्यामुळे शासनाने आदिवासी दिनाची सुट्टी (Govermnet Holiday) जाहीर करावी. आदिवासी दिन हा शासकीय पद्धतीने साजरा करण्यात यावा. आज प्रत्येक खेडोपाडी आदिवासी क्रांती दिन साजरा होत आहे. आदिवासी दिनाला चांगल्या प्रकारे पाया असणे आवश्यक असून कार्यक्रम तर होतच राहतील, त्यात खंड होणार नाही. माझ्या मतदारसंघात मतदार मंडळी किंवा नाशिक जिल्हा हा एक वेगळ्या समाधानाचा जिल्हा आहे. आजच्या कार्यक्रमाला प्रत्येक आदिवासी आमदारांची येण्याची इच्छा होती, मी प्रत्येकाला सांगितलं तुम्ही तुमच्या मतदारसंघात कार्यक्रम घ्या, मी एकटा विधिमंडळात कार्यक्रम घेत आहे. माझ्या दिंडोरी मतदारसंघातील जनता अतिशय सुज्ञ असून म्हणून माझ्यासारख्या अशा गबाळ्या माणसाला तीन वेळा आमदार केलं मी त्यांना मनापासून धन्यवाद देईन."
आदिवासींच्या विकासासाठी निधी कमी पडतोय...
आदिवासी घटकाचा आस्थापनाचा जो निधी होता, तो स्वतंत्र केल्यामुळे 363 कोटी रुपये फक्त पगारावर जात आहेत. महत्त्वाचं म्हणजे आदिवासी घटकाला 9.35 टक्के इतके बजेट मिळणे आवश्यक असताना ते 7.35 टक्के मिळतं. जवळपास साडेतीन हजार कोटी रुपये कमी पडतात, एका वर्षाला साडेसहा हजार रुपये कमी पडतात. आदिवासी घटकाला फक्त योजना पुरवल्या जातात, मात्र योजना जर पैसा नसेल तर योजना कशासाठी असा सवाल यावेळी नरहरी झिरवाळ यांनी उपस्थित केला. त्यामुळे सरकारला विनंती आहे की आस्थापनांचा पैसा हा परत करावा. दोन टक्के जो काही निधी कमी पडतो आहे, तो दोन टप्प्यात द्यावा. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते की, तीन टप्प्यात दिले जातील, मात्र हा निधी दोन टप्प्यात द्यावा, अशी विनंती देखील झिरवाळ यांनी यावेळी केली.
इतर महत्वाच्या बातम्या :